एकूणच येवल्यातील पैठणी विणकर कारागीर आपल्यातील कला पैठणीच्या माध्यमातून व्यक्त करत असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे.
2/8
यापुर्वी कोकणे यांनी राधाकृष्ण तसेच हरणांचे कळप असलेली पैठणी साकरली. मात्र यावेळी साकारलेली ही पैठणी नेहमीच्या पैठणीपेक्षा आगळीवेगळी ठरलीय. विशेष म्हणजे ज्या ग्राहकाने ही पैठणी तयार करण्यास सांगितले ती पैठणी एस्कॉन मंदीरात देण्यात येणार आहे. अतिशय सुंदर पध्दतीने विणकाम केलेली ही पैठणी अनकांच लक्ष वेधणारी ठरत आहे.
3/8
एका ग्राहकाने कोकणे यांना अशा स्वरुपाची पैठणी तयार करण्याची ऑर्डर दिल्यानंतर कोकणे यांनी दिड ते पावणे दोन महिन्याच्या काळात अतिशय सुंदर अशी श्रीकृष्ण आणि मिराबाई यांची कलाकृती हुबेहुब पैठणीवर साकारली आहे.
4/8
अशाच प्रकारे येवल्यातील पैठणी विणकर असलेल्या सुनिल कोकणे या विणकराने श्रीकृष्ण आणि त्याच्यावर निस्सिम भक्ती असलेल्या मिराबाईची कलाकृती पैठणीवर साकारली आहे.
5/8
ग्राहकांचा बदलता ट्रेड पाहता मागील वेळी जंगलातील पशू-पक्षांची पैठणी दाखवली होती. याच बरोबर अनेक विणकरांनी छंदा पौटी,कधी साईबाबा तर कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पैठणीवरचे शेले सुध्दा पैठणीवर साकारलेले आपण पाहिले आहे.
6/8
समस्त महिला वर्गाचे आवडते महावस्त्र म्हणजे पैठणी. पैठणीचं नाव घेताच डोळ्यासमोर येते ते म्हणजे येवला शहर. विविध प्रकारच्या आर्कषक डिझाईनच्या ग्राहकांना हव्या तशा पैठणी येथील कारागीर तयार करत असतात.
7/8
यापूर्वी आपण जंगलातील पैठणी पाहिली असेल मात्र आज आम्ही तुम्हा पैठणीवर चक्क श्रीकृष्ण आणि त्याची निस्सिम भक्त असलेल्या मिराबाईची पैठणी साकारलेली आहे.
8/8
पैठणीचे शहर म्हणून ओळखल्या जाणा-या येवला शहरात अनेक घरांमध्ये पैठणी विणकामाच हात माग सुरु असतात. अनेक विणकर आकर्षक पद्धतीने पैठणी विणत असतात.