एक्स्प्लोर
आमदार श्रीनिवास वनगा यांची मृत शेतकऱ्याच्या कुटुंबास मदत
shrinivas vanga
1/6

शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे आमदार आपल्या मतदार संघात परतले असून पालघर विधान सभेचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी मतदार संघात फिरायला सुरुवात केली आहे.
2/6

डहाणू तालुक्यातील चारोटी येथील गेटी पाड्यातील एका शेतकऱ्याचा सोमवारी सकाळी नदी ओलांडून जाताना मृत्यू झाला होता.
3/6

रमेश घोष्या या मयत शेतकऱ्याच्या कुटुंबास पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी गेटीपाडा येथे जाऊन त्याच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन करत आर्थिक मदत केली.
4/6

त्याचप्रमाणे वनगा यांनी आठ दिवसांपूर्वी अल्फा हॉटेलसमोर महामार्ग ओलांडताना सारणी येथील गरीब मजुराचा ट्रक खाली चिरडून मृत्यू झाला होता. त्यांच्या घरी भेट दिली.
5/6

सारणी येथील घरी जाऊन त्यांच्या पत्नी व चार मुलांना आर्थिक मदत देऊन त्यांच्या शिक्षणासाठी मदतीचे आश्वासन दिले.
6/6

या वेळी त्यांच्या सोबत तालुका प्रमुख अशोक भोईर सह कार्यकर्ते ही उपस्थित होते.
Published at : 06 Jul 2022 08:58 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























