एक्स्प्लोर
चिपळुणातील नांदिवसे-राधानगर परिसरात डोंगराला भेगा..नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
पहिल्याच पावसात कोकणातील रत्नागिरीतील चिपळूणच्या नांदीवसे राधानगरीतील डोंगराला भेगा गेल्या आहेत..त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
chiplun
1/5

कोकणातील सह्याद्री खोऱ्यातील नांदीवसे गावातील..भला मोठा डोंगर आणि त्यात वसलेले हे दीड हजार लोकवस्तीच राधनगर..हे सध्या पावसात भीतीच्या छायेखाली जगत आहे..कारण ज्या डोंगराच्या पायथ्याशी लोकवस्ती आहे. आता त्याच डोंगराला वरच्या बाजूने लोठमोठ्या भेगा पडल्या आहेत..दोन वर्षापूर्वी कोकणातील पावसाळ्यात महाडमधील तळीये आणि रत्नागिरी खेड मधील पोसरे येथे डोंगर,दरड खाली सरल्याने त्यात अनेकांचा मृत्यु झाला होता..या जखमा ताज्या असतानाच आता राधानगर येथील डोंगराला पहिल्याच पावसात भेगा गेल्या आहेत..
2/5

गेली दोन वर्ष या डोंगराला ठिकठिकाणी भेगा जाऊन डोंगर खचतोय..या पडलेल्या भेगांमध्ये पावसाचे पाणी आत गेल्याने या भेघांची तीव्रता अधिकच वाढत आहे..त्यामुळे या डोंगराच्या भागांतील वस्तीला धोका निर्माण झालाय..
3/5

डोंगराच्या भागांत आणि पायथ्याशी 25 घरे आहेत..तर गावांतील लोकवस्ती दीड हजार इतकी आहे. सध्या या रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
4/5

प्रशासनाने इथल्या 17 कुटुबांना स्थलांतराच्या नोटीसा बजावल्या आहेत. मात्र दरवर्षी पावसाळा आला की नोटीसा देतात, पण कायमस्वरुपी स्थालांतराच्या स्वरुपाच्या उपाययोजना करीत नाहीत..प्रशासन का दुर्लक्ष करताय असा प्रश्न स्थानिकांना पडलाय..
5/5

पावसाला आता कुठे सुरुवात झालेली आहे..अजुन पाऊस बाकी आहे. या डोंगराला पडलेल्या भेगांची तिव्रता पाहिली तर या पावसात कोणतीही घटना घडू शकेल हे नाकारता येत नाही..
Published at : 01 Jul 2023 11:07 PM (IST)
आणखी पाहा























