एक्स्प्लोर
Pune News : स्वच्छ पर्यावरणपूरक पुण्यासाठी धावले 28 हजार पुणेकर
जगदीश मुळीक फाउंडेशनच्यावतीने पुणेथान मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

pune marathon
1/8

जगदीश मुळीक फाउंडेशनच्यावतीने पुणेथान मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
2/8

पुढील पाच वर्षात पुणे शहराला स्वच्छ आणि पर्यावरणपूरक शहर बनविण्याच्या निर्धाराने 28 हजार पुणेकरांनी जगदीश मुळीक फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या पुणे थॉन मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.
3/8

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचे झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले. संयोजक जगदीश मुळीक, प्रविण दबडगाव, एस के जैन, योगेश मुळीक, सुनिल देवधर, अंकुश काकडे, धिरज घाटे,बापुसाहेब पठारे, दिप्ती चौधरी, शैलेश टिळक, योगेश मुळीक,रंजनकुमार शर्मा, गणेश बिडकर,शशिकांत बोराटे, कुणाल टिळक, गणेश घोष,रवींद्र साळेगावकर, वर्षा तापकीर, पूनीत जोशी, राहुल भंडारे, महेश पुंडे, संदिप सातव, रवि सांकला, राहुल सातव, राजू संकला यांची प्रमुख उपस्थिती होती.
4/8

मुळीक म्हणाले, पुणे ही राज्याच्या सांस्कृतिक राजधानीसह क्रीडाप्रेमी आणि आपल्या आरोग्याची नेहमीच काळजी घेणाऱ्या हेल्थ काँशिअस शहर म्हणून ही ओळखले जाते. त्यामुळे डिसेंबर महिन्यात विविध संस्थांद्वारे मॉरथॉनचे आयोजन केले जाते.
5/8

image 5
6/8

यात हजारो तरुण -तरुणी, अबालवृद्ध सारेच सहभागी होत असतात. पुणे हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले शहर असल्याने येथे चहुबाजूंनी निसर्गाची मुक्त उधळण होत असते.
7/8

त्यामुळे पुण्याचे वैभव टिकवण्यासाठी हरित आणि प्रदूषणमुक्त व स्वच्छ पुण्याचा संकल्प करत आपल्या पुणे शहराला जागतिक पातळीवरील शहर म्हणून ओळख मिळवून देण्याच्या निश्चयाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
8/8

पुणेकरांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
Published at : 23 Dec 2023 05:25 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion