एक्स्प्लोर
Pune News : पूर परिस्थितीसाठी पुणे प्रशासन सज्ज; खेडमध्ये मॉक ड्रिलचं आयोजन
पूर परिस्थितीसाठी पुणे प्रशासन सज्ज झालं आहे. खेडमध्ये मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं.

mock drill
1/9

इर्शाळवाडीतील घटनेनंतर पुणे प्रशासन सज्ज झालं आहे.
2/9

अशी घटना पुण्यातील ग्रामीण भागात घडू नये यासाठी तयारी सुरु केली आहे.
3/9

पुणे जिल्हा आरोग्य विभाग आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी पूर आणि भूस्खलनाच्या तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी गुरुवारी मॉक ड्रिल आयोजित केले होते.
4/9

पुणे जिल्हा परिषदेच्या सूचनेनुसार जिल्ह्याच्या इतर भागातही अशा मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात येणार आहे.
5/9

आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व सरकारी विभाग त्यांची तयारी तपासण्यासाठी या सरावात सहभागी झाले होते.
6/9

भीमा-भामा नदी संगमावरील शेल पिंपळगाव गावात पूरस्थिती हाताळण्याची तयारी तपासण्यासाठी मॉक ड्रिल घेण्यात आलं.
7/9

आरोग्य विभाग आणि चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यात सहभागी झाले होते.
8/9

ड्रिल दरम्यान एका व्यक्तीची सुटका करण्यात आली आणि त्याला कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (CPR) देण्यात आले.
9/9

त्यानंतर रुग्णवाहिका बोलावून डमी रुग्णाला शेल पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा असल्याने मॉक ड्रिल घेण्यात आलं.
Published at : 21 Jul 2023 11:24 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
भारत
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion