राज्यभरात झालेल्या पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. धबधबे प्रवाहित होत आहेत. आनंदाची बाब म्हणजे लोणावळ्यातील भुशी धरणही ओव्हरफ्लो झालं आहे.
2/8
ओव्हरफ्लो झाल्याने धरणाच्या पायऱ्यांवरुन पाणी ओसंडून वाहत आहे.
3/8
. परंतु यंदाही पर्यटकांना या धरणावर जाऊन भिजण्याच्या आनंदाला मुकावं लागणार आहे. इथे पर्यटकांना येण्यास बंदी आहे.
4/8
पर्यटनबंदी झुगारुन आलेल्या पर्यटकांना लोणावळा पोलिसांनी हुसकावून लावलं. पर्यटनबंदी असल्याने पोलिसांनी अशी भूमिका घेतली आहे.
5/8
वीकएण्ड असल्याने पुणे-मुंबईचे पर्यटक या धरणावर हजेरी लावतील, त्यामुळेच खबरदारी म्हणून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लोणावळा पोलिसांनी इथे बंदोबस्त ठेवला आहे.
6/8
यामुळे पर्यटकांचा तर हिरमोड झालाच, शिवाय पर्यटनस्थळावर अवलंबून असणाऱ्या व्यापारीही संतप्त झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील पर्यटनबंदी हटवली मग पुणे जिल्ह्यातील पर्यटनबंदी कायम का ठेवली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
7/8
पावसाळ्यातील पुणे आणि मुंबईकरांचं हक्काचं तसंच आवडीचं ठिकाण म्हणजे भुशी धरण. दरवर्षी हजारो पर्यटक इथे येतात.
8/8
गेल्या आठवडाभरापासून लोणावळा परिसरात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी सतत कोसळत आहेत. यामुळे लोणावळ्याचा परिसर अत्यंत नयनरम्य झाला असून डोंगरदऱ्या हिरवा शालू परिधान केल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही.