वर्षभरापासून प्रत्येक सण हा साध्याच पद्धतीनं साजरा केला जात आहे. मध्यंतरीच्या काळास भक्तांच्या दर्शनासाठी मंदिराची कवाडं खुली करण्यात आली होती. पण, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं पुन्हा एकदा मंदिरं बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्रात घेण्यात आला.
2/5
सध्या सुरु असणाऱ्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर चैत्र नवरात्रोत्सवही साधेपणानं साजरा केला जात आहे.
3/5
आज या नवरात्रोत्सवात महाअष्टमी असल्यामुळं काही भाविकांनी मुंबापुरीचं अराध्य दैवत असणाऱ्या मुंबादेवी मंदिरापाशी येत दर्शन घेतलं.
4/5
मंदिर बंद असल्यामुळं बाहेरुनच देवीच्या छायाचित्रापुढे, कळसाकडे पाहत शक्य त्या परीनं भाविकांनी श्रद्धासुमनं अर्पण केली.
5/5
संकटकाळी तुची तारी भक्तांना माते, असं म्हणत या संकटसमयी लढण्याचं बळ देत आता यातून बाहेरही काढण्याची कृपा तूच कर अशीच भावना आणि प्रार्थना या भाविकांनी केल्याचं पाहायला मिळालं. (सर्व छायाचित्र- एएनआय)