एक्स्प्लोर
Photo : व्हीलचेअरवर निघालीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षणवारी
कल्याण, ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई या जिल्ह्यातून ही यात्रा फिरणार असून या यात्रेत लोकांनी मदत करावी आणि विद्यार्थ्यांचं भविष्य घडवावं हाच उद्देश आहे.

मैत्रकूल संस्था
1/7

समाजात बहिष्कृत असलेली मुली-मुलं ,आत्मविश्वास खचलेले विद्यार्थी, शिक्षणापासून अनेक कारणाने वंचित राहिलेल्या मुलांना हक्काचे छत मिळावं, तसेच मुलांचं हव्या त्या क्षेत्रात शिक्षण व्हावं म्हणून सर्वांनी एकत्र येत मदत करावी यासाठी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि मैत्रकूल जीवन विकास केंद्राचे संस्थापक किशोर जगताप यांची व्हीलचेअरवर "शिक्षणवारी" निघाली आहे.
2/7

कल्याण ते कुलाबा अशी 6 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट ही यात्रा सुरू आहे. या यात्रेत लोकांनी मदत करावी आणि विद्यार्थ्यांचं भविष्य घडवावं हाच उद्देश आहे. कल्याण, ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई या जिल्ह्यातून ही यात्रा फिरणार आहे.
3/7

पायात रॉड असताना ही गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यासाठी झटणारे किशोर जगताप व्हीलचेअरवर ही यात्रा करत आहेत.
4/7

मैत्रकूल यात्रा प्रत्येक ठिकाणी फिरत असताना, लोकांकडे असणारी रद्दी, भंगार, पुस्तक आणि जे साहित्य लोकांना आवडीने द्यायचं आहे ते द्या असे आवाहन विद्यार्थी व जगताप यांच्याकडून करण्यात आले आहे.
5/7

मिळालेली भंगार रद्दी विकून मैत्रकुलचा छोटा मोठा दैनंदिन खर्च भागवाला जाणार आहे. तसेच मैत्रकुलसाठी मिळणाऱ्या आर्थिक मदतीतून विद्यार्थ्यांचं शिक्षण व विद्यार्थ्यासाठी हक्काची वास्तू खरेदी केली जाणार आहे.
6/7

समाजातील अत्यंजांचे दु:ख जाणून त्या उपेक्षितांचे दु:ख दूर करण्याचे कार्य ‘मैत्रकुल जीवन विकास केंद्र’ करत आहे. संस्थेचे संस्थापक किशोर जगताप हे विविध सामाजिक चळवळींशी संबंधित होते आणि आहेत.
7/7

विविध सामाजिक संस्था स्थापन केल्यानंतर, त्यांना जाणवले की वंचित, पीडित आणि समाजप्रवाहापासून सर्वार्थाने दूर असलेल्यांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचायला हवी. त्यातूनच मग 5 वर्षापूर्वी निर्मिती झाली ‘मैत्रकुल जीवन विकास केंद्रा’ची. हे केंद्र आणि उपक्रम सर्व लोकांनी केलेला मदतीवर चालते. या माध्यमांतून अनेक विद्यार्थी गेल्या काही वर्षांपासून शिकण घेत तिथेच राहतात. या केंद्रात विद्यार्थ्यांचे गुण ओळखून त्यांना हवे असलेल्या गोष्टी करायला मिळतात.
Published at : 11 Aug 2022 10:58 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
मुंबई
भविष्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
