एक्स्प्लोर
Mumbai Local Mega block: मुंबईकरांनो, घराबाहेर पडण्यापूर्वी प्रवासाचं नियोजन करा; आज लोकल मार्गांवर मेगाब्लॉक
Mumbai Local Train Mega block: उपनगरीय रेल्वे मार्गावरील रेल्वे रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी 8 जानेवारी 2023 रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mumbai Local Train Mega block
1/8

Mumbai Local Train Mega block: मध्य रेल्वेच्यावतीने (Central Railway) , रविवारी 8 जानेवारी रोजी मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. या रविवारी असणारा मेगाब्लॉक हा हार्बर ( Harbour line) आणि ट्रान्सहार्बर मार्गांवर ( Trans harbour line) असणार आहे.
2/8

उपनगरीय रेल्वे मार्गावरील रेल्वे रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी 8 जानेवारी 2023 रोजी मध्य रेल्वेचा हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
3/8

काही लोकल रद्द करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.
4/8

पश्चिम रेल्वेवर अंधेरी - बोरिवली अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्यमार्गावर दिवसा कोणताही मेगाब्लॉक नसणार नाही.
5/8

पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते बोरिवली अप-डाऊन जलद मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान सर्व अप आणि डाऊन जलद गाड्या अंधेरी आणि बोरिवली स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत.
6/8

मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बरवरील ठाणे-वाशी, नेरुळ आणि हार्बरवरील सीएसएमटी-चुनाभट्टी, वांद्रे स्थानकादरम्यान दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक. ब्लॉक कालावधीत या मार्गांवरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
7/8

ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
8/8

मेगाब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांना रविवारी 8 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुख्य मार्गावरून आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी असणार आहे.
Published at : 08 Jan 2023 09:42 AM (IST)
आणखी पाहा























