एक्स्प्लोर
Ganeshotsav 2023: लाडक्या बाप्पाला निरोप! पाहा बाप्पाच्या विसर्जनाची 'ही' खास दृश्यं
यंदा देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. अखेर अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणपती बाप्पांना साश्रु नयनांनी निरोप देण्यात आला.

Ganpati Visarjan
1/11

देशभरात यंदा गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळाली. अनेकांच्या घरी अनंत चतुर्थीला, म्हणजेच 19 सप्टेंबरला लाडके बाप्पा विराजमान झाले.
2/11

यंदा आकर्षक गणपती बाप्पांच्या मूर्तींनी बाजार सजले होते. बाप्पाच्या सुंदर मूर्तींची झलक सर्वत्र पाहायला मिळाली. कांजुर मार्गच्या गवाणकर कुटुंबियांकडेही यंदा फेटा घातलेले बाप्पा विराजमान झाले होते.
3/11

तर भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेच्या यशामुळे बहुतेकांच्या घरी बाप्पाच्या सभोवताली चांद्रयानचे देखावे पाहायला मिळाले.
4/11

काहींच्या घरी दीड दिवसांचे, काहींच्या घरी पाच दिवसांचे, तर काहींच्या घरी सात दिवसांचे बाप्पा विराजमान झाले होते. या सर्व बाप्पांच्या विसर्जनानंतर आता दहा दिवसांच्या बाप्पांना देखील निरोप देण्यात आला.
5/11

कृत्रिम हौदांत, समुद्रात बाप्पांचं विसर्जन झालं.
6/11

मोठ्या भक्तिभावाने गणेशाची पूजा-अर्चना झाल्यानंतर बाप्पाला निरोप देण्यात आला.
7/11

कोकणातही बाप्पांना साश्रु नयनांनी निरोप देण्यात आला.
8/11

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! म्हणत भाविकांनी बाप्पाला निरोप दिला.
9/11

मुंबई, पुण्यातील मंडळांचीही धूमधडाक्यात विसर्जन मिरवणूक निघाली होती.
10/11

ऐन विसर्जनावेळी पावसाच्या वर्षावात बाप्पाचा निरोप सोहळा पार पडला.
11/11

लौटके तुझको आना है... म्हणत भाविकांनी बाप्पाला निरोप दिला.
Published at : 28 Sep 2023 06:58 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
