दीपोत्सव आणि स्वरमैफल असा दुहेरी आनंद शिवजन्मस्थळी शिवप्रेमींनी अनुभवला.
2/6
फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती निमित्ताने खास कार्यक्रमाचे आयोजन
3/6
जुन्नरच्या सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेच्या वतीने शिवजन्म स्थळी स्वरदीपोत्सव साजरा करण्यात आला.
4/6
राजगुरुनगर येथील संगीत विशारद नंदकुमार कोरे यांच्या गुरुकुल संगीत विद्यालयातील गायक वादक कलाकारांनी ही मैफल सजवली.
5/6
शिवजन्मस्थळी पुष्पसजावट दीपोत्सवाच्या निमित्ताने अधिकच उजळून गेली होती. येथे उपस्थित अबालवृद्धांनी दिलेल्या शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणांनी शिवनेरी दुमदुमून गेला.
6/6
शिवजन्मस्थळाच्या पाषाणी महिरपींमधून आत येणाऱ्या चंद्रप्रकाशाची शितल साथ या स्वरमैफलीला अधिकच तेजस्वी करून गेली होती.