एक्स्प्लोर
PHOTO: अमित ठाकरेंनी गाजवलं फुटबॉलचं मैदान! नाशिकमध्ये फ्रेंडली सामन्यात एकापाठोपाठ एक गोलचा धडाका
Amit Thackeray
1/7

राजकारणाचं मैदान गाजविण्यासाठी वॉर्मअप करणाऱ्या अमित राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये फुटबॉलचे मैदानही गाजवले.
2/7

उत्कंठावर्धक फ्रेंडली सामन्यात एकापाठोपाठ एक गोलचा धडाका लावला. फुटबॉलच्या मैदानातील हा स्ट्रायकर राजकीय मैदानात गोल साधणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
3/7

राजकीय खेळी खेळण्यासाठी नाशिकमध्ये आलेल्या अमित ठाकरे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या.
4/7

त्यानंतर त्यांनी दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी स्वतःला रिफ्रेश करण्यासाठी फुटबॉलच्या मैदानात एन्ट्री केली.
5/7

सामना फ्रेंडलीच होता मात्र खेळाडू कसलेले होते. तरीही त्यांच्या हद्दीत जाऊन गोल करत आपल्या संघाला आघाडीवर ठेवले.
6/7

मात्र आता अमित ठाकरे यांच्यां राजकीय खेळीकडे लक्ष लागलं असून सांघिक खेळाच्या जोरावर मनसेला निवडणुकीच्या मैदानात यश मिळवून देणार का नाशिकच्या बालेकिल्लावर पुन्हा मनसेचा झेंडा फडकविणार का याकडे लक्ष लागलाय.
7/7

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकेकाळचा नाशिक हा गड होता मात्र एकेक करत गडाचे बुरुज ढासळत गेले. सरदार इतर पक्षांना जाऊन मिळाले आणि मनसेच्या पतनाला सुरवात झाली. त्यामुळे हा गड पुन्हा काबीज करण्यासाठी राज आणि अमित ठाकरे हे पिता पुत्र मैदानात उतरले आहेत.
Published at : 18 Jul 2021 11:41 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
भारत
आशिया कप 2022



















