एक्स्प्लोर
Solapur : सायन्स सेंटरमध्ये मिग 21 या लढाऊ विमानाचे सुपर सॉनिक इंजिन, फायटर जेट दाखल!

MiG 21
1/8

सोलापूरच्या सायन्स सेंटरमध्ये मिग 21 या लढाऊ विमानाचे सुपर सॉनिक इंजिन दाखल झाले आहे. याशिवाय, हवाई दलाने अलीकडेच एका निवृत्त झालेले फायटर जेट केंद्राला भेट म्हणून दिले आहे.
2/8

विशेष म्हणजे या फायटर जेटच्या कॉकपीटमध्ये बसून तुम्ही संपूर्ण विमानाची माहिती जाणून घेऊ शकणार आहात. त्यामुळे एअरोडायनॅमिक्सची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही पर्वणीच म्हणावी लागेल. या शिवाय प्रात्यक्षिकातून विज्ञान शिकवणारे अनेक प्रयोग या विज्ञान केंद्रात आहेत.
3/8

एकीकडे सायन्स सेंटरच्या इमारतीत प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून अनौपचारिक अध्यापनाला चालना देत असताना केंद्राने अडीच एकर जागेवर विज्ञान उद्यान उभारले आहे. पार्कमध्ये सिद्धांत-आधारित कंपन, गणित, संवेदना, गुरुत्वाकर्षण, संगीत, ध्वनी आणि बरेच काही यावर 58 प्रात्यक्षिके आहेत.
4/8

भारताचे माजी राष्ट्रपती स्व. एपीजे अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून सोलापुरातील हे सायन्स सेंटर उभे राहिले आहे. 2010 साली तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते या सायन्स सेंटरचे उद्घाटन झाले. तेव्हापासून विद्यार्थी, शिक्षक आणि विज्ञानाची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी हे सायन्स सेंटर खुले आहे.
5/8

राज्यात मुंबई आणि नागपूरनंतर तिसरे सायन्स सेंटर हे सोलापुरात आहे.
6/8

या सायन्स सेंटरमध्ये विज्ञानाचे अनेक प्रयोग पाहायला मिळतील. पुस्तकात शिकवले जाणारे आणि सामान्यतः किचकट वाटणारे अनेक प्रयोग मनोरंजनाच्या माध्यमातून आपल्याला हा सायन्स सेंटरमध्ये पाहायला मिळतील. तारा मंडळ सारख्या प्रयोगांमुळे विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राची माहिती मिळणार आहे.
7/8

शिवाय सायन्स सेंटरमध्ये अत्याधुनिक असे टेलिस्कोप आहेत ज्यामुळे प्रत्यक्ष आकाश दर्शन करता येणार आहे. सायन्स सेंटरच्या समोर असलेल्या पार्क मध्ये प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञांचे जीवन आणि कार्य, विविध संस्कृतींमधील गणितीय पद्धती दर्शविणारे गणितीय टोटेम, डायनासोरचे स्वागत करण्याच्या प्रतिकृती इत्यादींचा समावेश आहे.
8/8

दिवाळीच्या सुट्टीत जर तुम्हाला एक दिवसाची सहल करायची असल्यास सोलापूरच्या या सायन्स सेंटरला अवश्य भेट द्या.
Published at : 03 Nov 2021 12:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
