एक्स्प्लोर
Maharashtra Weather Update: तापमानाची आच वाढणार, उष्णतेच्या लाटांचे तीव्र अलर्ट, पुण्यासह कुठे काय तापमान? येत्या 4 दिवसात...
राज्यात कमाल तापमानाचा पारा पुढील काही दिवस आणखी वाढणार असल्याचं IMD ने सांगितलं असून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेचे अलर्ट देण्यात आले आहेत.
Temperature Today
1/9

राज्यात प्रचंड उष्मा वाढलाय. विदर्भ वगळता आता संपूर्ण महाराष्ट्रात उकाडा चांगलाच वाढलाय.
2/9

उष्णतेचा चटका बसत असून कमाल तापमानाचा पाराही वाढत जातोय.त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
3/9

आज विदर्भात काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला असला तरी बहुतांश ठिकाणी तापमान 40 अंशांच्या पुढे राहिले.
4/9

अकोल्यात आज 44.5 अंश सेल्सियस तर वाशिम 42.4 अंश, यवतमाळ 42.9, अमरावती 42.8, नागपूर 42.3 अंश सेल्सियसवर आहे.
5/9

मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उन्हाच्या झळांनी नागरिक बेजार झाले आहेत.
6/9

पुण्यात आज 40.8 अंश सेल्सियस तर सोलापूर 41.5 अंशांवर आहे. मराठवाड्यात परभणीत सलग चौथ्या दिवशी तापमान 42 अंशांच्या पुढे नोंदवले गेले.
7/9

कोकणासह मुंबई, उपनगर, ठाणे, पालघरमध्ये उष्ण व दमट हवामान आहे.
8/9

आज विदर्भातील अमरावती, वर्धा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर,भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत. तर मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिवमध्ये उष्णतेचा अलर्ट आहे.
9/9

येत्या तीन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट राहणार असून विदर्भात अवकाळी पावसाचा अलर्ट देण्यात आलाय.
Published at : 29 Apr 2025 04:16 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























