एक्स्प्लोर
PHOTO : पुण्यात सत्ताधारी-विरोधकांकडून एकमेकांच्या कारभाराची होळी

BJP and NCP
1/9

राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यात केंद्र सरकारच्या आणि पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचाराची होळी करण्यात आली आहे.
2/9

यावेळी राष्ट्रवादीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने बोंब मारत होळीचे दहन केले.
3/9

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे वाढलेली महागाई, भ्रष्टाचार, जातिवाद तसेच पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचा ई व्हेईकल घोटाळा, नदी सुधार घोटाळा , 14 लाखांचे झाड, ॲमिनिटी स्पेस विक्री घोटाळा, 3200 फ्लॅट विक्री घोटाळा, जलपर्णी घोटाळा, कॉफिटेबल बुक घोटाळा या विविध घोटाळ्यांच्या अनिष्ट व नकारात्मक गोष्टींचे दहन करत राष्ट्रवादीकडून प्रतिकात्मक होळी साजरी केली.
4/9

यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्लाबोल केला.
5/9

राष्ट्रवादीच्या या आंदोलनामध्ये शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
6/9

राष्ट्रवादी काँग्रेस नंतर पुणे शहर भाजपच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराची होळी करण्यात आली आहे.
7/9

यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
8/9

"सर्व वाईट प्रवृत्ती जाळण्याचे प्रतीक म्हणजे होळी आहे. हे सरकार सामान्य माणसांवर अन्याय करत आहे. सरकारला आमदारांचा निधी वाढवण्यासाठी, ड्रायव्हरचा पगार वाढवण्यासाठी पैसे आहेत. परंतु, शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई द्यायला पैसे नाहीत. एसटी कामगारांचा विषय सुटत नाही, महिलांवरील अत्याचार कमी होत नाहीत. त्यामुळे या सर्व वाईट प्रवृत्तीची होळी आज पुण्यातील भाजप कार्यालयात करण्यात आली, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
9/9

चंद्रकांत पाटील म्हणाले, "द काश्मीर फाईलसमध्ये जे भयाण चित्र दाखवण्यात आलं आहे, ती वस्तुस्थिती नाहीय का? हे एकदा मान्य करा. काश्मीर मधील हिंदू माणूस काश्मीर सोडन पळून नाही का गेला? काश्मीरमधील महिलांवर बलात्कार झाले नाहीत का? काश्मीरमधील पंडितांची संपत्ती हडप केली नाही काय? देशाचा इतिहास दाखवायला हवा. आम्ही लोकांना तो सिनेमा दाखवू. फार काळ सत्य दाबून ठेऊ शकत नाही."
Published at : 17 Mar 2022 11:27 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
विश्व
सोलापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
