एक्स्प्लोर
Kolhapur News : सतेज पाटलांच्या चिकाटीमुळेच थेट पाईपलाईन पूर्ण; सर्वपक्षीय नागरी सत्कारात पृथ्वीराज चव्हाणांकडून कौतुक
काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना सातत्याने पाठपुरावा करून पूर्णत्वास आणल्याबद्दल सतेज पाटील यांचा सर्वपक्षीय गौरव समितीकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Kolhapur News
1/9

मोठ्या महापालिका असूनही तिथे योजना करता आलेल्या नाहीत. केवळ आमदार सतेज पाटील यांच्या जिद्द व चिकाटीमुळेच थेट पाईपलाईनसारखी महत्त्वाकांक्षी व अवघड योजना पूर्णत्वाला आली, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
2/9

कोल्हापूरच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला. चांगलं, सक्षम हाती नेतृत्व दिले, तर विकास कसा होऊ शकतो, हा कोल्हापूरचा आदर्श राज्यात दिला जाईल’, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
3/9

शंभरहून अधिकांचा सत्कार थेट पाईपलाईन वचनपूर्ती लोकसोहळ्यात श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते झाला.
4/9

शाल, राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा देऊन सत्कार करण्यात आला.
5/9

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्यमंत्री चव्हाण बोलत होते.
6/9

सर्वपक्षीय गौरव समितीच्या वतीने दसरा चौकात हा सोहळा झाला.
7/9

या लोकसोहळ्यासाठी विविध भागांतील महिलांनी घागरींमधून योजनेचे पाणी वाजतगाजत आणले होते.
8/9

हा माझ्यासाठी अत्यंत समाधानाचा क्षण आहे. आपल्या सर्वांचे प्रेम, सदिच्छा व पाठिंबा सदैव पाठीशी राहू देत, हीच या निमित्ताने मी विनंती करू इच्छितो, असे सतेज पाटील म्हणाले.
9/9

विकासासाठी राजकीय नेतृत्व असे मजबूत असले पाहिजे. पाणी योजनेचा वीजखर्च कायमस्वरूपी बंद करण्यासाठी सोलर प्रकल्प राबवला जावा. तसेच मुबलक पाणी आहे म्हणून वाया घालवता कामा नये, असे शाहू महाराज यांनी सांगितले.
Published at : 22 Nov 2023 05:45 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
विश्व
व्यापार-उद्योग
























