एक्स्प्लोर
Vande Bharat Express Accident: 'वंदे भारत'ची म्हशीच्या कळपाला धडक, एक्स्प्रेसचं झालं नुकसान, पाहा फोटो
Vande Bharat Express : वंदे भारत एक्स्प्रेसने ट्रेनने म्हशीच्या कळपाला धडक दिली. या धडकेत ट्रेनच्या पुढील भागाचे नुकसान झाले. पाहा या अपघाताचे फोटो...
Vande Bharat Express Accident: 'वंदे भारत'ची म्हशीच्या कळपाला धडक, एक्स्प्रेसचं झालं नुकसान, पाहा फोटो
1/10

मोठ्या थाटामाटात गांधीनगर ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचं काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी लोकार्पण केले.
2/10

वंदे भारत एक्स्प्रेस ही भारताची सेमी हाय स्पीड ट्रेन आहे.
3/10

भारतातील सर्वात आधुनिक आणि नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांसह सुसज्ज असलेल्या या ट्रेनचा वेग ताशी 180 किमी आहे, परंतु सध्या ती 130 किमी प्रतितास वेगाने धावते.
4/10

मुंबई सेंट्रलवरुन गुजरातच्या गांधीनगरकडे येणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसने म्हशींच्या कळपाला धडक दिली. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही धडक झाली.
5/10

वंदे भारत ट्रेन वातवा स्टेशनवरुन मणिनगरच्या दिशेने येत होती.
6/10

त्याचवेळी अचानक म्हशींचा कळप रेल्वे ट्रॅकवर आला आणि ही जोरदार धडक झाली.
7/10

यात एक्सप्रेसचा पुढचा भाग अक्षरश: तुटून पडला आहे.
8/10

या अपघाताचे व्हिडीओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
9/10

या घटनेत ट्रेनचं थोडं नुकसान झालं आहे मात्र वाहतुकीला कुठल्याही प्रकारचा अडथळा आलेला नाही. सर्व ट्रेन्स आपल्या निश्चित वेळेमध्ये धावत असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
10/10

गुजरातमध्ये गायी आणि म्हशीपालन करणाऱ्या लोकांना वंदे भारत ट्रेनच्या वेळापत्रकाची माहिती नसल्याने म्हशींचे कळप रुळांवर आले. आता त्यांना जागृत करण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Published at : 06 Oct 2022 04:24 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
मुंबई
महाराष्ट्र
कोल्हापूर


















