एक्स्प्लोर
Uttarkashi Tunnel Collapse : बोगद्यामध्ये अडकलेल्या 41 मजुरांची अवस्था बिकट, 9 दिवसांपासून बचावकार्य सुरुच
Uttarakhand Tunnel Accident : उत्तराखंडमधील उत्तरकाशी शहरामध्ये निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळल्याने 41 कामगार आतमध्ये अडकले आहेत.
Uttarkashi Silkyara Tunnel Accident
1/10

उत्तराखंड टनेल कोलॅप्स बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने रविवारी रात्री उशिरा रस्त्याचे बांधकाम थांबवलं आहे. (Image Source : PTI)
2/10

उत्तरकाशीमध्ये 12 नोव्हेंबर रोजी बोगद्याचा काही भाग कोसळल्यानंतर 41 कामगार अडकलेले आहेत. (Image Source : PTI)
3/10

192 तासांनातरही बचावकार्य सुरुच आहे. आज बचावकार्याचा 9 वा दिवस असून कामगारांना बाहरे काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. (Image Source : PTI)
4/10

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्ता तयार करताना बोगद्यात कंपन झाल्याचं समोर आलं आहे. सुमारे 100 मीटर रस्त्याचे काम अद्याप बाकी आहे. (Image Source : PTI)
5/10

बोगद्याच्या आत कामगारांसाठी 125 मिमी पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. रात्री उशिरा हा पाइप 57 मीटरपर्यंत टाकण्यात आला.(Image Source : PTI)
6/10

आता पंतप्रधान कार्यालयाने चार ठिकाणी बचाव कार्य चालवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगद्यात सुमारे 60 मीटरचा रस्ता बनवायचा आहे. (Image Source : PTI)
7/10

यामध्ये, एक SJVNL बोगद्याच्या वर, ONGC बोगद्यात तिरपे मार्ग बनवत आहे आणि THDCIL बोगद्याच्या दुसऱ्या टोकापासून मार्ग काढत आहे. (Image Source : PTI)
8/10

बोगद्यात अडकलेल्या कामगारांना पाईपच्या मदतीने ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी वॉकीटॉकीद्वारे संपर्क झाल्याची माहिती समोर आली आहे. (Image Source : PTI)
9/10

इंदूरहून नवीन मशिन आणले आहे जे आता बोगद्याच्या 200 मीटर आत नेले जात आहे जेणेकरून रखडलेले काम पुढे नेले जाईल. आता समोरून आडवे ड्रिल करण्याऐवजी उभ्या म्हणजे वरून छिद्र पाडले जातील जेणेकरून मलबा सहज काढता येईल (Image Source : PTI)
10/10

आतापर्यंत बोगद्याच्या आत 70 मीटर पसरलेल्या ढिगाऱ्यात 24 मीटरचा खड्डा पडला आहे. मात्र हे प्रमाण निम्मेही नाही, त्यामुळे कामगारांना बाहेर काढण्यासाठी अजून किमान चार ते पाच दिवस लागतील, असा दावा केला जात आहे. (Image Source : PTI)
Published at : 20 Nov 2023 10:32 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























