एक्स्प्लोर
ISRO SSLV D2 : इस्रोच्या 'बेबी रॉकेट'चं दुसरं यशस्वी उड्डाण, पृथ्वीच्या कक्षेत तीन उपग्रहांचं प्रक्षेपण
ISRO SSLV D2 Launch : भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोकडून SSLV D2 रॉकेट (Small Sataellite Launch Vehicle) लाँच करण्यात आलं आहे.

ISRO Baby Rocket SSLV D2 Launch
1/10

इस्रोने SSLV D2 लाँच केलं आहे. या रॉकेटमधून अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट (EOS 07) सह काही लहान उपग्रहांना पृथ्वीभोवतीच्या कक्षेत सोडण्यात आलं आहे. (PC : ANI)
2/10

श्रीहरीकोटा येथून या उपग्रहाचं प्रक्षेपण यशस्वीरित्या पार पडलं आहे. या 'बेबी रॉकेट'मधून तीन सॅटेलाईट लाँच करण्यात आले आहेत. (PC : ANI)
3/10

SSLV-D2 रॉकेटमधून अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट (EOS 07), अमेरिकन कंपनी अँटरीसचा 'जानस 1' आणि देशभरातील विद्यार्थिनींनी बनवलेल्या 'आझादीसॅट 2' या लहान उपग्रहांना पृथ्वीभोवती 450 किमीच्या वर्तुळाकार कक्षेत सोडण्यात आलं आहे. (PC : ANI)
4/10

इस्रोचं सर्वात छोटं म्हणजेच 'बेबी रॉकेट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या SSLV D2 नं दुसरं उड्डाण केलं आहे. आज SSLV D2 चं दुसरं प्रायोगिक उड्डाण यशस्वीरित्या पार पडलं आहे. (PC : ANI)
5/10

आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे उपग्रह प्रक्षेपण पार पडलं आहे. (PC : ANI)
6/10

विशेष म्हणजे SSLV-D2 रॉकेटचं पहिलं प्रक्षेपण अयशस्वी ठरलं होतं. त्यानंतर आता या रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण झालं आहे. (PC : ANI)
7/10

लहान उपग्रहांना कमी वेळेत आणि कमी खर्चात अवकाशात पाठवता यावे यासाठी इस्रोकडून (ISRO) एसएसएलव्ही' (SSLV) या नव्या रॉकेटची निर्मिती करण्यात आली आहे. (PC : ANI)
8/10

SSLV-D2 ने तीन उपग्रह (Satellite) घेऊन अवकाशात उड्डाण केलं. हे तीन उपग्रह पृथ्वीच्या 450 किलोमीटर अंतराच्या वर्तुळाकार कक्षेत सोडले जातील. (PC : ANI)
9/10

SSLV रॉकेटमधून अमेरिकन कंपनी अँटारिसचा उपग्रह जानस-1, चेन्नईचा स्पेस स्टार्टअप स्पेसकिड्झचा (SpaceKidz) उपग्रह 'आझादीसॅट 2' (AzaadiSAT-2) आणि ISRO चा उपग्रह EOS-07 या तीन उपग्रहांचं प्रक्षेपण पार पडलं आहे. (PC : ANI)
10/10

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, SSLV चा वापर 500 किलो वजनाच्या उपग्रहांना खालच्या कक्षेत सोडण्यासाठी केला जातो.
Published at : 10 Feb 2023 11:08 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
राजकारण
बातम्या
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
