एक्स्प्लोर
North East Tour Package : ईशान्य भारत फिरण्याची इच्छा आहे? IRCTC चं खास पॅकेज; शिलाँग आणि चेरापुंजीसह अनेक ठिकाणं फिरण्याची संधी
IRCTC Tour : ईशान्ये भारत फिरण्यासाठी आयआरसीटीसी (IRCTC) ने एक खास टूर पॅकेज आणलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला विविध ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल.
IRCTC North East Tour Package
1/11

भारताचा ईशान्य भाग नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरणासाठी ओळखला जातो.
2/11

जर तुम्ही इथे भेट देण्याचा विचार करत असाल तर IRCTC च्या खास टूरची माहिती जाणून घ्या.
3/11

भारतातील ईशान्येकडील राज्य, तेथील संस्कृती आणि सौंदर्यासाठी फक्त भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहेत.
4/11

तुम्हालाही हिरवेगार पर्वत आणि नद्या अशा रमणीय वातावरणाता आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही IRCTC चं खास टूर पॅकेज बुक करू शकता.
5/11

या पॅकेजमध्ये तुम्हाला आसाममधील गुवाहाटी, मेघालयातील शिलाँग, चेरापुंजी, मावलिनॉन्ग यासारख्या ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल.
6/11

आयआरसीटीसी नॉर्थ इस्ट टूर पॅकेज एक फ्लाइट पॅकेज आहे. हे चेन्नई, आंध्र प्रदेश येथून सुरू होईल.
7/11

तुम्ही 10 फेब्रुवारी 2024 पासून पॅकेजचा आनंद घेऊ शकता. हे संपूर्ण पॅकेज 7 दिवसांचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला ईशान्येतील अनेक प्रसिद्ध ठिकाणे पाहण्याची संधी मिळेल.
8/11

तुम्हाला या पॅकेजमध्ये तुम्हाला चांगल्या एसी हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा मिळणार आहे. तसेच स्थानिक प्रवासासाठी पर्यटक बसची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
9/11

पॅकेजमध्ये तुम्हाला सिंगल बुकींगसाठी प्रति व्यक्ती 53,600 रुपये मोजावे लागतील. तर कपल किंवा दोन व्यक्तींच्या बुकींगसाठी 47,500 रुपये आणि तीन लोकांच्या बुकींगसाठी 44,500 रुपये भरावे लागतील.
10/11

यामध्ये तुम्हाला काझीरंगा नॅशनल पार्क जीप सफारीचा आनंद घेता येईल. या पॅकेजमध्ये तुम्हाला दिवस ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरची सुविधा देखील मिळेल.
11/11

IRCTC नॉर्थ इस्ट टूर पॅकेजबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि बुकिंगसाठी तुम्ही http://tinyurl.com/LTCFPNE या वेबसाईटला भेट देऊ शकता.
Published at : 10 Dec 2023 11:34 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
व्यापार-उद्योग
नागपूर
क्राईम
























