एक्स्प्लोर
भारतीय हवाई दलाचा फ्रान्ससोबत लष्करी सराव; राफेलमधून उंच आकाशात Air Exercise
Garuda VII : भारतीय हवाई दलाचे (IAF) चीफ मार्शल व्हीआर चौधरी (Air Marshal V R Chaudhari) यांनी फ्रान्ससोबतच्या लष्करी सराव दरम्यान राफेल लढाऊ विमानातून उड्डाण केलं आहे.
india garuda vii air exercise indian air force
1/9

Garuda VII : भारतीय हवाई दलाचे (IAF) चीफ मार्शल व्हीआर चौधरी (Air Marshal V R Chaudhari) यांनी फ्रान्ससोबतच्या लष्करी सराव दरम्यान राफेल लढाऊ विमानातून उड्डाण केलं आहे. यावेळीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
2/9

भारत आणि फ्रान्समधील संरक्षण आणि द्विपक्षीय संबंध प्रदर्शित करताना, भारतीय हवाई दल (IAF) चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी राफेल या लढाऊ विमानातून आकाशात भरारी घेतली.
3/9

भारत आणि फ्रान्स यांच्यातील द्विपक्षीय सराव मंगळवारी जोधपूर येथे आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये फ्रान्सचे हवाई प्रमुख जनरल स्टीफन मिल यांनी भारतीय-रशियन वंशाच्या IAF Su-30MKI लढाऊ विमान 'गरुड'मधून उड्डाण केलं.
4/9

FASF प्रमुखांसह प्रसारमाध्यमांशी बोलताना चौधरी यांनी माहिती दिली की, गरुड दोन्ही हवाई दलांना ऑपरेशन्स दरम्यान एकमेकांच्या सर्वोत्तम पद्धती शिकण्याची आणि आत्मसात करण्याची अनोखी संधी उपलब्ध करुन देत आहे.
5/9

चौधरी यांनी 2003 पासून नियमित द्विपक्षीय सरावासह प्रत्येक आवृत्तीत विकसित होत असलेल्या भारत आणि फ्रान्स या दोन हवाई दलांमधील वाढत्या परस्पर कार्यक्षमतेवर प्रकाश टाकला.
6/9

फ्रान्स हवाई दलाचे प्रमुख जनरल स्टेफन मिल यांनी सोमवारी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि नौदलाचे उपप्रमुख अॅडमिरल एसएन घोरमाडे यांचीही भेट घेतली.
7/9

गरुड VII LCA तेजस आणि अलीकडेच सामील झालेले LCH प्रचंड यांची आंतरराष्ट्रीय सरावात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सरावात चार FASF राफेल लढाऊ विमानं आणि एक A-330 मल्टी रोल टँकर ट्रान्सपोर्ट (MRTT) विमानांचाही सहभाग आहे.
8/9

LCA आणि LCH व्यतिरिक्त, IAF दलात Su-30 MKI, राफेल आणि जॅग्वार लढाऊ विमानं, तसेच Mi-17 हेलिकॉप्टरचाही समावेश आहे.
9/9

IAF दलामध्ये फ्लाइट रिफ्यूलिंग एअरक्राफ्ट, AWACS, AEW&C आणि गरुड स्पेशल फोर्सेस यांसारख्या कॉम्बॅट एनेबलिंग एसेट्सचाही समावेश आहे.
Published at : 09 Nov 2022 07:56 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
