एक्स्प्लोर
G20 Summit: गाला डिनरला परदेशी पाहुण्यांची हटके स्टाईलमध्ये एन्ट्री; पाहा फोटो
G20 Summit: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 9 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे G20 गाला डिनरचं आयोजन केलं होतं. यावेळी अनेक जागतिक नेते आणि राष्ट्राध्यक्ष पोहोचले होते.

G20 Summit Dinner
1/10

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिनरसाठी काळ्या रंगाच्या फॉर्मल जॅकेटऐवजी आरामदायी व्ही-नेक स्ट्रीप जॅकेट परिधान केलं होतं. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी मोत्यांचा हार असलेली साडी परिधान करून डिनरला हजेरी लावली.
2/10

मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ आणि त्यांच्या पत्नी कोबिता जगन्नाथ यांच्यासह पारंपारिक पोशाखात दिल्लीतील भारत मंडपममध्ये डिनरसाठी हजेरी लावली.
3/10

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांनीही डिनरला हजेरी लावली. अक्षताने बहुरंगी ड्रेस परिधान केला होता.
4/10

अक्षती मूर्तीने ऋषी सुनक यांच्यासोबत पंतप्रधान मोदींना नमस्कार करुन वंदन केलं.
5/10

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी रॉयल ब्लू टायसह काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता, तर त्यांची पत्नी युको किशिदा साडी नेसून डिनरला पोहोचली होती.
6/10

ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज राखाडी रंगाच्या सूटमध्ये आणि त्यांची जोडीदार जोडी हेडन टर्टलनेक निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये डिनरला उपस्थित होते.
7/10

इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो आणि त्यांची पत्नी इरियाना जोको विडोडो हे देखील फॅन्सी स्टाईलमध्ये पोहोचले होते.
8/10

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या डिनरला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या MD क्रिस्टालिना जॉर्जिवा भारतीय सूटमध्ये दिसल्या, त्या सलवार सूट घालून आल्या होत्या.
9/10

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदींनी जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांचं देखील स्वागत केलं.
10/10

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रिपब्लिक कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल आणि त्यांच्या पत्नीचं देखील स्वागत केलं.
Published at : 10 Sep 2023 08:16 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
