एक्स्प्लोर
In Pics : शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा 'चलो दिल्ली', आज ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन

Farmers tractor rally in Delhi
1/7

केंद्र सरकारने गेल्या वर्षी तीन नवीन कृषी कायदे संसदेत पारित केले होते. त्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु असून त्या आंदोलनाला आज सात महिने पूर्ण झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आज ट्रॅक्टर रॅलीची घोषणा केली असून दिल्लीकडे कूच करणार असल्याचं सांगितलं आहे.
2/7

केंद्र सरकारने हे तीनही नवीन कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी केली आहे. रॅलीच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितलं की, केंद्र सरकार या शेतकरी आंदोलकांशी चर्चा करण्यात तयार आहे.
3/7

या कायद्यावरुन आतापर्यंत केंद्र सरकार आणि शेतकरी आंदोलकांमध्ये चर्चेच्या 11 फेऱ्या पार पडल्या असून त्यामधून कोणताही तोडगा निघाला नाही.
4/7

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितलं की, ज्या गोष्टींवर शेतकऱ्यांना आक्षेप आहे त्या गोष्टींचे निराकरण करण्यासाठी केंद्र सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चर्चेसाठी पुढं यावं.
5/7

शेतकऱ्यांकडून चर्चेचा प्रस्ताव आल्यास केंद्र सरकार त्यासाठी तयार आहे असं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी स्पष्ट केलं.
6/7

आजच्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन पाहता दिल्लीमधील तीन मेट्रो स्टेशन सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत बंद राहतील असं सांगण्यात आलं आहे.
7/7

सुरक्षेचा विचार करता दिल्ली युनिव्हर्सिटी, सिव्हिल लाईन्स आणि विधानसभा हे तीन मेट्रो स्टेशन्स आज बंद राहतील असं डीएमआरसी ने स्पष्ट केलं आहे.
Published at : 26 Jun 2021 07:34 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
