एक्स्प्लोर
Advertisement

Covid19 Updates : देशातील कोरोना संसर्गात किंचित वाढ, XBB व्हेरियंटचे रुग्ण किती? जाणून घ्या...
XBB Variant in India : देशातील XBB व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे. तर देशात 2,570 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

Coronavirus Cases Today in India
1/12

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नव्या आकडेवारीनुसार, भारतात बुधवारी 175 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली आहे.
2/12

भारतातील कोविड रुग्णांची संख्या 4.46 कोटी आहे तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5,30,707 आहे.
3/12

भारतात आतापर्यंत 220 कोटी कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोविड-19 रिकव्हरी रेट 98.80 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
4/12

कोरोना संसर्गातून आतापर्यंत 4,41,45,854 लोक बरे झाले आहेत तर, मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के आहे.
5/12

अमेरिकेत (America) धुमाकूळ घालणाऱ्या XBB.1.5 सब व्हेरियंटच्या (Coronavirus XBB 1.5 Variant) भारतातील रुग्णांचा आकडा पाचवर पोहोचला आहे.
6/12

सध्या देशात कोरोनाच्या XBB व्हेरियंटचे (XBB Variant) पाच रुग्ण आहेत. गुजरातमध्ये (Gujrat Corona Patients) तीन रुग्ण आढळले असून कर्नाटक (Karnataka) आणि राजस्थानमध्ये (Rajasthan) प्रत्येकी एक-एक रुग्ण आढळला आहे.
7/12

देशातील कोरोना संसर्गात किंचित वाढ झाली आहे. आज 175 रुग्ण सापडले आहेत. काल देशात 173 रुग्ण सापडले होते.
8/12

जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग, सिंगापूर आणि थायलंड या देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला.
9/12

या पार्श्वभूमीवर या सहा देशांतून भारतात येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल अनिवार्य करण्यात आला आहे.
10/12

जगभरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार सतर्क आहे. खबरदारीची पावले उचलली जात आहेत. कोविड चाचणी आणि लसीकरणावर भर दिला जात आहे.
11/12

आरोग्या प्रशासनाकडून नागरिकांन बूस्टर डोस घेण्याचे आवाहन केले जात आहे.
12/12

image 12
Published at : 04 Jan 2023 12:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
भविष्य
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
