एक्स्प्लोर
Chandra Grahan: आज वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण, मध्यरात्री 1.05 मिनिटांनी होणार सुरू
Chandra Grahan 2023: आज मध्यरात्रीपासून चंद्रग्रहणाला सुरुवात होणार असून आजचं चंद्रग्रहण हे वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण असेल.

Chandra Grahan 2023
1/7

आज मध्यरात्रीपासून चंद्रग्रहणाला सुरुवात होणार आहे. मध्यरात्री 1 वाजून 05 मिनिटांपासून चंद्रग्रहण सुरु होईल.
2/7

तर 1 वाजून 44 मिनिटांनी सर्वाधिक ग्रहण होईल. यावेळी चंद्र 10 ते 12 टक्के ग्रस्तोदित असणार आहे.
3/7

परंतु साध्या डोळ्याने न दिसणारे छायाकल्प चंद्रग्रहण 3.56 वाजता संपणार आहे.
4/7

या चंद्रग्रहणावेळी चंद्रासोबत पृथ्वीच्याजवळ येत असलेल्या गुरू ग्रहाची युती दिसेल. तसंच आज होणारं ग्रहण या वर्षांतील शेवटचं चंद्रग्रहण असेल.
5/7

चंद्रग्रहणामुळे राज्यातील अनेक मंदिरात धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
6/7

चंद्रग्रहणामुळे अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरातील पूजेसह धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मात्र या कालावधीत भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं असणार.
7/7

यावर्षीचं पहिलं चंद्रग्रहण हे 5 मे रोजी झालं होतं.
Published at : 28 Oct 2023 10:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
