एक्स्प्लोर
Amarnath Yatra 2023 : अमरनाथ शिवलिंगाची पहिली झलक, बाबा बर्फानी यांचे फोटो समोर; 1 जुलैपासून सुरु होणार अमरनाथ यात्रा
Amarnath Yatra 2023 : अमरनाथ यात्रेआधी अमरनाथ गुहेतून शिवलिंगाचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंतून भाविकांनी बाबा बर्फानी यांची पहिली झलक पाहायला मिळत आहे.
Amarnath Yatra 2023 | Jammu Kashmir
1/9

या फोटोमध्ये अमरनाथ गुहेतील नैसर्गिक हिमलिंग पूर्ण आकारात दिसत आहे. अमरनाथ यात्रा सुरू होण्यास अजून महिना बाकी असून सध्या यात्रेची तयारी जोरात सुरू आहे. अशात आता पवित्र अमरनाथ गुहेतून शिवलिंगाची फोटो समोर आले आहेत.
2/9

अमरनाथ गुहेतील समोर आलेल्या फोटोमध्ये पवित्र शिवलिंगासोबतच माता पार्वती आणि श्री गणेश याचं प्रतीक मानलं जाणारं हिमस्तंभही पूर्ण आकारात दिसत आहे.
3/9

अमरनाथ यात्रा सुरू होण्यासाठी एक महिना बाकी असून अधिकारी आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी अमरनाथ गुहेत जाऊन सुरक्षेच्या व्यवस्थेसाठी पाहणी केली. यावेळी त्यांनी पवित्र शिवलिंगाचे फोटो शेअर केले आहेत.
4/9

अमरनाथ यात्रेचा मार्ग तयार करण्याचं काम सध्या जोरात सुरू आहे. श्राइन बोर्ड आणि सुरक्षा दलाचे अधिकारी बंदोबस्तासाठी गुहेत पोहोचले आहेत.
5/9

यात्रेच्या मार्गावरील बर्फ हटवण्याचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. बर्फ कापून हा मार्ग प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर बनवला जात आहे. लष्कराची बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन येथील बलताल आणि चंदनवाडी या दोन्ही मार्गांवर काम सुरु आहे.
6/9

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी अधिक बर्फवृष्टी झाली असून अद्यापही संपूर्ण मार्गावर दहा ते वीस फूट बर्फ साचला आहे.
7/9

image 7
8/9

यंदाची अमरनाथ यात्रा 1 जुलैपासून सुरू होत असून ती 30 ऑगस्ट रोजी म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी संपेल. सरकारने 10 एप्रिल रोजी अमरनाथ यात्रेचे वेळापत्रक जाहीर केलं होतं. अमरनाथ यात्रेचा हा प्रवास 62 दिवस चालणार आहे. यात्रेसाठी 17 एप्रिलपासून ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने नोंदणी सुरू झाली आहे.
9/9

अमरनाथ यात्रा 2023 साठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यासाठी भाविकांचं वय 13 ते 75 वर्षे दरम्यान असावं. यासोबतच जर एखादी महिला सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ गरोदर असेल तर त्यांना यात्रेसाठी परवानगी देण्यात येणार नाही.
Published at : 31 May 2023 09:02 AM (IST)
आणखी पाहा























