एक्स्प्लोर
PHOTO : मराठा आरक्षणासाठी दिव्यांग तरुणाचे थेट कळसुबाई शिखरावर उपोषण
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन आणि उपोषण सुरु आहे. तर, आता आरक्षणासाठी एका दिव्यांग तरुणाने थेट कळसुबाई शिखरावर (Kalsubai Peak) उपोषण सुरु केले आहे.

disabled youth protest in Kalsubai peak
1/8

मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणीसाठी गावागावात आंदोलन केले जात आहे. प्रत्येकजण होईल त्या पद्धतीने आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधून घेत आहे.
2/8

तर, मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी एका दिव्यांग तरुणाने थेट कळसुबाई शिखरावर उपोषण सुरु केले आहे.
3/8

अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन म्हणून शिवाजी गाडे या दिव्यांग तरुणाने महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समजल्या जाणाऱ्या सर्वोच्च कळसुबाई शिखरावर उपोषण सुरू केले आहे.
4/8

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून महाराष्ट्रात ठिकठिकाणी विविध प्रकारचे आंदोलने सुरू असून, अशाच प्रकारचे लक्षवेधी आंदोलन पैठणच्या दिव्यांग तरुणाने सुरू केले आहे.
5/8

या दिव्यांग तरुणाने उपोषणासाठी 1646 मीटर अर्थात 5400 फुट उंच असलेल्या कळसुबाई शिखराची निवड करुन उपोषण सुरु केले आहे.
6/8

रात्रीच्या किर्र अंधारात आणि कडाक्याच्या थंडीसह दिवसा रखरखत्या उन्हात या तरुणाकडून उपोषण करण्यात येत आहे.
7/8

शुक्रवार (27 ऑक्टोबर) ते रविवार (29 ऑक्टोबर) असे सलग तीन दिवस हे उपोषण करण्यात येत आहे.
8/8

महाराष्ट्रातील सर्व जातीय 30 लाख, तर मराठा समाजाच्या 15 लाख दिव्यांगांच्या वतीने प्रातिनिधिक प्रतिनिधी म्हणून हे आंदोलन छेडल्याची प्रतिक्रिया शिवाजी गाडे यांनी दिली आहे.
Published at : 28 Oct 2023 06:31 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
आयपीएल
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion