एक्स्प्लोर
Maruti Suzuki Invicto : मारुती सुझुकीची 'ही' कार भारतात लॉन्च; फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल
Maruti Suzuki Invicto : मारूती सुझुकीच्या या कारची स्पर्धा Kia Carnival आणि Toyota Innova Crysta सारख्या कारबरोबर केली जाणार आहे.
Maruti Suzuki Invicto
1/6

Maruti Suzuki MPV: आज मारुती सुझुकीने देशांतर्गत बाजारात आपली प्रीमियम MPV कार Invicto लाँच केली. जर तुम्ही सुद्धा मारुती सुझुकीच्या वाहनांचे चाहते आहात तर तुम्हाला ही एमपीव्ही नक्की आवडेल.
2/6

Maruti Suzuki Invicto MPV ही कंपनीची सर्वात महागडी कार ठरली आहे, जी 24.79 लाख रुपये एक्स-शोरूम ते रुपये 28.42 लाख एक्स-शोरूमच्या किंमतीत खरेदी केली जाऊ शकते.
3/6

मारुतीची ही एमपीव्ही तीन व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. जे Zeta+ 7 सीटर, Zeta+ 8 सीटर आणि अल्फा+ 7 सीटर आहेत. ज्यामध्ये अल्फा + हा टॉप एंड व्हेरिएंट आहे.
4/6

इन्व्हिक्टो सुरक्षा वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. ज्यामध्ये सहा एअरबॅग्ज टू हिल होल्ड असिस्ट, ABS, वाहन स्थिरता नियंत्रण, थ्री पॉइंट सीट बेल्ट, 360 व्ह्यू कॅमेरा, TPMS तसेच पुढील आणि मागील चाकांवर डिस्क ब्रेक समाविष्ट आहेत.
5/6

मारुती सुझुकी इनव्हिक्टो टोयोटा हायक्रॉसवर आधारित आहे. मात्र, त्यात काही बाह्य बदलही पाहायला मिळतात. मारूती सुझुकीच्या या कारची स्पर्धा Kia Carnival आणि Toyota Innova Crysta सारख्या कारबरोबर केली जाणार आहे.
6/6

मारुती सुझुकी इनव्हिक्टो ही हायब्रीड पॉवर ट्रेनसह सादर करण्यात आली आहे. या कारचे मायलेज 23.24 किमी/ली पर्यंत असेल. यामध्ये दिलेली इंधन टाकी 52 लिटर क्षमतेची आहे.
Published at : 06 Jul 2023 12:56 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण


















