मुख्यपृष्ठफोटो गॅलरीऑटोप्रीमियम लूक, लक्झरी फीचर्स; सिंगल चार्जमध्ये BMW i4 देते 590KM ची रेंज
प्रीमियम लूक, लक्झरी फीचर्स; सिंगल चार्जमध्ये BMW i4 देते 590KM ची रेंज
By : सतिश केंगार | Updated at : 26 May 2022 11:48 PM (IST)
BMW i4
1/6
प्रीमियम आणि लक्झरी कार निर्माता BMW (BMW) ने गुरुवारी आपली इलेक्ट्रिक कार BMW i4 Electric (BMW i4) भारतात लॉन्च केली आहे.
2/6
कंपनीने याची एक्स-शोरूम किंमत 69.90 लाख रुपये इतकी ठेवली आहे. सेडान सेगमेंटमधील ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 590 किमी किमीपर्यंत धावू शकते, असा दावा कंपनीने केला आहे.
3/6
कंपनीने या मध्यम आकाराच्या सेदान कारची बुकिंग सुरू केली आहे. ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या कारची प्री-बुकिंग करू शकता. कंपनी जुलै 2022 मध्ये BMW i4 ची डिलिव्हरी सुरू करेल. कंपनीने गेल्या 180 दिवसांत ही तिसरी इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च केली आहे.
4/6
BMW i4 इलेक्ट्रिक कारची मोटर 340ps ची पॉवर आणि 430Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. या कारची टॉप स्पीड 190 किमी प्रतितास आहे.
5/6
ही कार 80.7 kW क्षमतेच्या बॅटरी पॅकने सुसज्ज आहे. पूर्ण चार्ज झाल्यावर ही कार 590 किमीपर्यंत धावू शकते. ही रेंज भारतातील कोणत्याही इलेक्ट्रिक कारच्या रेंजपेक्षा जास्त आहे.
6/6
ग्राहकाला कारसोबत 205kw DC फास्ट चार्जर मिळेल. कारची बॅटरी केवळ 31 मिनिटांत 10 टक्के ते 80 टक्के चार्ज होते. BMW 11kw वॉल बॉक्स AC चार्जर ऑफर करत आहे, जे ही कार 8 तासात शून्य ते 100% चार्ज करते.