एक्स्प्लोर
तळकोकणातील वेंगुर्ले मानसीश्वराची आगळवेगळी जत्रा
Sindhudurg : शिडाची आणि दिवाबत्तीची जत्रा म्हणून राज्यात प्रसिद्ध

Sindhudurg
1/10

जत्रा म्हटली की, लाउड स्पीकरचे सूर, विद्युत रोषणाईचा झगमगाट आणि गर्दी हे चित्र अपेक्षित आहे. मात्र तळकोकणातील वेंगुर्ले येथील मानसीश्वराच्या स्थानावर भाविकांचा महापूर असतो, पण कानठळ्या बसणारे आवाज नसतात आणि डोळे दिपून टाकणारी रोषणाई केली जात नाही.
2/10

या ठिकाणी फडकणारी असंख्य भगवी निशाणं लक्ष वेधून घेतात. हे स्थान आहे श्री देव मानसीच्या देवचाराचे. याला मानसीश्वर असंही म्हणतात. श्री देव मानसीश्वराचे देवस्थान हे सिंधुदुर्गातील एक महत्वपूर्ण पर्यटनस्थळ आहे.
3/10

कुडाळ - वेंगुर्ले रस्त्यावर वेंगुर्ले शहराची हद्द संपताच मांडवी खाडी नाजिक आहे. नेहमीप्रमाणे मंदिर, गाभारा, मूर्ती असे काहीही याठिकाणी दिसत नाही.
4/10

१५ फुटाचे चौरस बंधा-याप्रमाणे बांधकाम आणि त्यावर रोवलेली असंख्य भगवी निशाणे दृष्टीस पडतात. त्यापुढे मंडप आहे.
5/10

बाकी केवळ आजूबाजूला झाडी आणि पाणी आहे. श्रद्धेने करतात. जत्रोत्सवादिवशी भगव्या निशाणीच्या पताका या देवस्थानाला भाविक लोक भेट घालतात.
6/10

सर्वात महत्त्वाचे म्हणजे यावेळी बांबूच्या काठीस भगवा झेंडा लावलेले निशाण घेऊन प्रत्येकजण येतात आणि भगव्या निशाणांनी देवस्थान सजते. भगव्या निशाणांचे विलोभनीय दृश्य दिसते.
7/10

जिल्ह्यातील मुंबई, गोवा, बेळगाव आणि कोल्हापूर येथूनही भाविक येऊन त्यांचा नवस फेडतात. या जत्रेत कोकणातील प्रसिद्ध दशावताराचा खेळ हा पेट्रोमॅक्सच्या बत्तीच्या उजेडात सादर केला जातो.
8/10

दिवाबत्तीच्या उजेडात सादर केला जाणारा दशावताराचा खेळ पाहण्याचा आनंद हा काही औरच!
9/10

शांतता, नैसर्गिक सान्निध्य असलेल्या या देवस्थानात पर्यटकही काही काळ विश्रांती घेतात.
10/10

देवाची काही भाविक मंडळी या देवास जिवंत खेकडे नवस म्हणून प्रदान करतात. मानसीश्वर देवस्थान अत्यंत जागृत आहे.
Published at : 30 Jan 2023 06:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
चंद्रपूर
क्रिकेट
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
