एक्स्प्लोर
History of mobile phones : मोबाईलचा शोध कोणी व कसा लावला? जाणून घ्या
History of mobile phones : मोबाईलचा शोध कोणी व कसा लावला? जाणून घ्या

मोबाईल हा दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आज संपूर्ण जगात एकूण लोकसंख्या पैकी जवळपास 3.5 Billion लोक मोबाईल चा वापर करत आहेत.(Photo Credit : Pixabay)
1/9

जसं जसे तंत्रज्ञानात विकास होतोय मोबाईल वापरणे खूप सोपे होत आहे आणि मोबाईल चा आकार आणि वजन देखील कमी होत आहे. जेव्हा पहिला मोबाईल तयार झाला तेव्हा तो आकारात आणि वजनात जड तसेच मोठा होता त्यामुळे ते वापरणे थोडे कठीण व्हायचे.(Photo Credit : Pixabay)
2/9

अनेक लोकांच्या मनात प्रश्न नक्कीच येत असेल तो म्हणजे मोबाईल चा शोध कोणी लावला, कधी लावला, मोबाईल म्हणजे नेमके काय या सर्वा प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या. (Photo Credit : Pixabay)
3/9

मोबाईल चा शोध मार्टिन कूपर ह्या अमेरिकन शास्त्रज्ञाने 1973 ला लावला. पहिला मोबाईल हा 2 kg इतक्या वजनाचा होता. प्रथम मोबाईल ची कल्पना जगासमोर आली आणि संवादाची परिभाषा बदलली. 1983 नंतर मोबाईल लोकांच्या दैनंदिन जीवनात एकरूप झाले.(Photo Credit : Pixabay)
4/9

मोबाईल चा शोध तर मार्टिन कूपर ने लावला पण तुम्हाला माहित आहे का?जगातील पहिला मोबाईल हा Motorola या कंपनी द्वारे तयार केला गेला. (Photo Credit : Pixabay)
5/9

(Photo Credit : Pixabay)
6/9

मार्टिन कूपर आणि त्यांचे तीन साथीदार Eric Degerstedt, W. Rae Young, Donald Cox यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईल तयार करण्यात आला. कालांतराने कामाचा वेग वाढवून मोटोरोला या कंपनी ने 1990 पर्यंत 1.5 कोटी पेक्षा जास्त मोबाईल तयार केले.(Photo Credit : Pixabay)
7/9

मोबाईल चा शोध हा दूर ध्वनी करण्याच्या उद्देशाने तयार केला होता. परंतु जस जसा कामात आणि तंत्रज्ञानात विकास होऊ लागला कामाची पद्धत बदलली आणि मोबाईल नवीन रूपाने लोकांसमोर आला. (Photo Credit : Pixabay)
8/9

आता न केवळ दूर ध्वनी करण्यासाठी याचा वापर केला जातो, तर games खेळणे, फोटो काढणे, व्हिडिओ तयार करणे असे अनेक कामे एका यंत्रातून केली जाऊ लागली.(Photo Credit : Pixabay)
9/9

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pixabay)
Published at : 09 Feb 2024 05:50 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
ट्रेडिंग न्यूज
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
