एक्स्प्लोर
Hill Stations in Maharashtra : नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रातील 'या' पर्यटन स्थळांना नक्कीच भेट द्या!
Hill Stations in Maharashtra : थंडीच्या या दिवसांत महाराष्ट्रातील चिखलदरा, लोणावळा, माथेरान आणि महाबळेश्वरसारखी ठिकाणं थंडीच्या दिवसांना अधिक सुंदर बनवतात.
Hill Stations in Maharashtra
1/10

सध्या नोव्हेंबरचा महिना सुरु झाला आहे आणि थंडीच्या या दिवसांत महाराष्ट्रातील हिल स्टेशनला भेट देणं म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव ठरू शकतो.
2/10

महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे तुम्ही गार हवेत निसर्गसौंदर्याचा आनंद लुटू शकता.
3/10

चिखलदरा हे सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले एक अप्रतिम हिल स्टेशन आहे. येथे तुम्हाला थंडगार हवा, दाट जंगलं आणि मनमोहक दृश्यं अनुभवायला मिळतात.
4/10

पुण्याजवळचं लोणावळा हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. पावसाळ्यात जसं लोणावळ्याचं सौंदर्य खुलून येतंसुंदर धबधबे पाहायला मिळतात, तसंच हिवाळ्यातही येथील निसर्ग मोहक दिसून येतो.
5/10

लोणावळ्याच्या अगदी जवळचं खंडाळा हे दुसरं प्रसिद्ध ठिकाण आहे. खंडाळ्यात अनेक फिरण्यासारखी ठिकाणं आहेत. येथील घाट आणि हिरवळ पर्यटकांना पुन्हा पुन्हा आकर्षित करतात.
6/10

माथेरान हे एक छोटे पण अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. माथेरानमध्ये मिनी ट्रेनने प्रवास करण्याचा अनुभव खूपच वेगळा आणि आनंददायक असतो.
7/10

भंडारदरा हे अजून एक अप्रतिम हिल स्टेशन आहे. येथे मोठे तलाव, सुंदर धबधबे आणि उंच डोंगर आहेत.
8/10

येथे सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दृश्य मन मोहून टाकतात. अनेक ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमी या ठिकाणी भेट देतात.
9/10

महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सातारा जिल्याहत वसलेले सर्वात लोकप्रिय आणि सुंदर हिल स्टेशन आहे.
10/10

महाराष्ट्रातील ही सर्व हिल स्टेशन निसर्ग, शांतता आणि थंड हवेचा आनंद देतात. अशा ठिकाणी काही दिवस घालवणं म्हणजे खऱ्या अर्थाने शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने होणं.
Published at : 06 Nov 2025 01:47 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
























