एक्स्प्लोर
Health Tips : थायरॉइड झाल्यावर चहाचं सेवन करावं की करू नये?
Health Tips : थायरॉइड झालेल्या रुग्णांना सकाळी अनेक गोष्टी खाण्यास मनाई केली जाते.

Tea
1/6

थायरॉइड आजार झालेल्या रुग्णांनी सकाळी अनोशेपोटी औषध घ्यावं लागतं. याच्या आधारेच थायरॉइड हार्मोन संतुलित करता येतो. यामुळे थायरॉइडच्या लक्षणांवरील नियंत्रण मिळवता येते.
2/6

थायरॉइड झालेल्या रुग्णांना सकाळी अनेक गोष्टी खाण्यास मनाई केली जाते. त्यामुळे थायरॉइड रुग्णांनी सकाळी औषधं घेतल्यावर काय खावं आणि काय खाऊ नये, याबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात.
3/6

तज्ज्ञांच्या मते, थायरॉइड झालेल्या व्यक्तींनी सकाळी चहा पिणं टाळावं. विशेषत: साखर आणि दूध असलेली चहा पिण्याची चूक (is milk tea good for thyroid patient) करु नका. यामुळे थायरॉइडची लक्षणं नियंत्रित होण्याऐवजी वाढण्याची शक्यता असते.
4/6

जर थायरॉइड झालेल्या व्यक्तींना सकाळी चहा पिण्याची इच्छा किंवा सवय असेल, तर तुम्ही औषध घेतल्याच्या 30 मिनिटांनंतर ग्रीन टी किंवा कोणतीही हर्बल टी पिऊ शकता. पण लक्षात ठेवा की, औषध घेतल्यानंतर लगेच चहा पिणं हानिकारक आहे. असं केल्या औषधांचा परिणाम कमी होतो.
5/6

थायरॉइड झाल्यावर जर तुम्हाला चहा पिण्याची इच्छा असेल तर, तुम्ही हळदीचा चहा, तुळशीचा चहा किंवा दालचिनीचा चहाचं सेवन करु शकता. यामुळे तुमची इम्युनिटी वाढण्यास मदत होईल. शिवाय या हर्बल टी मुळे हार्मोनल समस्यांवरही नियंत्रण मिळवता येईल.
6/6

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 05 Feb 2023 08:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
भारत
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
