एक्स्प्लोर
Health tips : ताप आलाय? 'या' घरगुती उपायांनी लवकर मिळेल आराम!
Health tips : तापावर 'हे' रामबाण उपाय!

तापावर 'हे' रामबाण उपाय! (Photo Credit : pixabay)
1/11

प्रथमोपचार म्हणून ताप आल्यावर त्वरित कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, त्यामुळे ताप कमी होण्यास मदत होते. तापामध्ये कधीही कोमट पाण्याने आंघोळ करावी. (Photo Credit : unsplash)
2/11

ताप आल्यावर आपण थंडी वाजू नये म्हणून जाड कपडे घालतो, जे चूकीचे आहे त्यामुळे गुदमरल्यासारखे होते,जे तापामध्ये चांगले नाही त्यामुळे तेव्हा शरीराला पुरेसी हवा लागणं महत्त्वाचे असते,त्यामुळे ताप आल्यावर हलके आणि सुतीकडे घालावे. (Photo Credit : unsplash)
3/11

गरम पाण्यात मध घालून प्यायल्याने तापात आराम मिळतो तसेच गरम सूप आणि वरणाचे पाणी पायल्याने पोट भरते. घशालाही शेक मिळतो. (Photo Credit : unsplash)
4/11

पुदिना, आलं, मध आणि मेथीच्या दाण्याचा काढा ताप आल्यावर दिवसातून २ वेळा प्यावा. तापात आराम मिळतो. तापात लसणाच्या पाकळ्या चघळल्यास ताप कमी होण्यास मदत होते. (Photo Credit : unsplash)
5/11

आल, दालचिनी, लवंग,सुंठ, गवती पात या सर्वांनी तयार झालेला चहा ताप , सर्दीवर लवकर आराम देतो.या सर्व पदार्थांना आयुर्वेदात मोठे महत्त्व आहे. (Photo Credit : unsplash)
6/11

तुळशीच्या पानांचा काढा ताप आल्यावर रामबाण उपाय आहे. या काढ्यामुळे घशालाही आराम मिळतो. पाण्यात भिजवलेले मनुके खाल्ल्याने ताप कंमी होण्यास मदत होते आणि तापात तोंडाला चवही येते. (Photo Credit : unsplash)
7/11

गरम पाण्याने गुळण्या केल्याने घशाला आराम मिळतो. गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या केल्यास जास्त फरक पडतो. ताप कमी होण्यास मदत होते. (Photo Credit : unsplash)
8/11

ताप कमी होण्यासाठी आपण 'हे' घरगुती उपाय करू शकतो. पण एक गोष्ट लक्षात असावी हे उपाय प्रथमोपचाराच्या स्वरूपात वापरावे. जास्त ताप असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. (Photo Credit : unsplash)
9/11

ओवा बारीक करून गरम पाण्यासोबत खाल्ल्याने शरीराला ऊब मिळते. शरीरातून घाम बाहेर पडून ताप उतरण्यास मदत होते. (Photo Credit : unsplash)
10/11

तापामध्ये काही खावे आणि प्यावेसे वाटत नाही त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवते.जे आरोग्यास चांगले नाही. ताप आल्यावर भरपूर प्रमाणात पाणी प्यावे,त्यामुळे आजारपणात शरीर डिहायड्रेट राहते. तसेच तापामध्ये संत्र्यांचा रस प्यायल्याने शरीरास आराम मिळतो. (Photo Credit : unsplash)
11/11

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)
Published at : 23 Jan 2024 11:05 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion