एक्स्प्लोर
Miss World 2024: टॉप 20 मध्ये सिनी शेट्टीने मिळवले टॉप 20 मध्ये स्थान!
71व्या मिस वर्ल्ड पेजेंट स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सिनी शेट्टीने टॉप 20 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.

(photo:sinishettyy/ig)
1/10

71 वी मिस वर्ल्ड स्पर्धा 20 फेब्रुवारी 2024 पासून सुरू झाली आहे. तब्बल 28 वर्षांनंतर भारत पुन्हा एकदा याचे यजमानपद भूषवत आहे.(photo:sinishettyy/ig)
2/10

. दिल्लीतील भारत मंडपम येथून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. (photo:sinishettyy/ig)
3/10

मिस वर्ल्ड 2024 मध्ये सिनी शेट्टी भारताकडून देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. 120 देशांतील अतिशय सुंदर महिला या स्पर्धेचा भाग बनल्या आहेत. आता सर्व स्पर्धक मुंबईत पोहोचले आहेत.(photo:sinishettyy/ig)
4/10

गेल्या शनिवारी, सिनी शेट्टीसह सर्व सुंदर स्पर्धकांनी मुंबईत रॅम्प वॉक केला. काल संध्याकाळी ७१व्या मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी सिनी शेट्टीने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये रॅम्पवर आपली जादू चालवली. यावेळी ती नेकलाइन स्लीव्हलेस आउटफिटमध्ये दिसली.(photo:sinishettyy/ig)
5/10

तिने कमीत कमी मेकअप आणि सॉफ्ट कर्ल्ससह तिचा लूक पूर्ण केला. (photo:sinishettyy/ig)
6/10

रॅम्पवर सिनी केवळ अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसली नाही तर ती खूप आत्मविश्वासाने दिसली.(photo:sinishettyy/ig)
7/10

सिनी शेट्टीने टॉप 20 मध्ये आपले स्थान निर्माण केल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय तिला आशिया आणि ओशनियामधील सर्वोत्कृष्ट डिझायनर ड्रेसची विजेती म्हणूनही घोषित करण्यात आले आहे.(photo:sinishettyy/ig)
8/10

देशभरातील लोकांना सिनीकडून मोठ्या अपेक्षा आहेत, ज्या दररोज वाढत आहेत. याआधी 21 व्या वर्षी सिनी शेट्टीने 2022 मध्ये फेमिना मिस इंडियाचा खिताबही जिंकला होता.(photo:sinishettyy/ig)
9/10

सिनी शेट्टी या काळात सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. स्पर्धेदरम्यानही ती सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांना शेअर करत असते.(photo:sinishettyy/ig)
10/10

आतापर्यंत ऐश्वर्या राय, प्रियांका चोप्रा, मानुषी छिल्लर, युक्ता मुखी, रीटा फारिया आणि डायना हेडन यांनी मिस वर्ल्डचा किताब जिंकून भारताची मान उंचावली आहे.(photo:sinishettyy/ig)
Published at : 04 Mar 2024 02:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
