एक्स्प्लोर
Swara Bhasker: स्वरा भास्करलाही जिवे मारण्याच्या धमक्या, अभिनेत्रीने उचलले हे पाऊल!

(photo:reallyswara/ig)
1/6

Swara Bhasker Death Threat: अलीकडेच बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. एका पत्राद्वारे अभिनेत्याला ही धमकी देण्यात आली होती. या बातमीने अवघ्या मनोरंजन विश्वात खळबळ उडाली होती आणि पोलीसही या प्रकरणाचा तपासात करत आहेत.(photo:reallyswara/ig)
2/6

सलमान खाननंतर आता बॉलिवूड इंडस्ट्रीतील बेधडक अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) हिलाही जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. अभिनेत्रीला तिच्या घरी स्पीड पोस्टद्वारे एक पत्र मिळाले आहे, ज्यामध्ये तिला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे.(photo:reallyswara/ig)
3/6

स्वरा भास्कर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमी आपले मत बेधडकपणे मांडत असते. यामुळे तिला अनेकदा ट्रोलिंग आणि वादांनाही सामोरे जावे लागले आहे. मात्र, यावेळी तिला थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका पत्राद्वारे तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.(photo:reallyswara/ig)
4/6

हे पत्र हिंदीत लिहिले असून, स्वराच्या घरच्या पत्त्यावर पोहोचवण्या आले आहे. यामध्ये तिला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. हे पत्र मिळाल्यानंतर स्वराच्या वतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची तक्रार नोंदवली आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.(photo:reallyswara/ig)
5/6

अभिनेत्री स्वरा भास्करला पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हे पत्र अभिनेत्रीच्या वर्सोवा येथील निवासस्थानी पाठवण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. हे पत्र मिळाल्यानंतर स्वरा भास्करने दोन दिवसांपूर्वी वर्सोवा पोलीस स्टेशन गाठले आणि अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.(photo:reallyswara/ig)
6/6

या पत्रात लिहिण्यात आले आहे की, वीर सावरकरांचा अपमान करणे थांबवा आणि फक्त स्वतःच्या चित्रपटांवर लक्ष केंद्रित करा, असा इशारा या अभिनेत्रीला देण्यात आला आहे. या पत्रात पाठवणाऱ्याचे नाव लिहिलेले नाही. मात्र, हे पत्र पाठवणाऱ्याने स्वत:ला आपण भारताचे नागरिक असल्याचे म्हटले आहे.(photo:reallyswara/ig)
Published at : 30 Jun 2022 02:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सातारा
राजकारण
पुणे
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
