एक्स्प्लोर
(Source: DV Research)
Mrunal Thakur dress price : मृणाल ठाकूरच्या महागड्या रेड ड्रेसची तुफान चर्चा, किंमत ऐकून अवाक व्हाल!
Mrunal Thakur dress price : अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या लाल रंगाच्या ड्रेसची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. मात्र या ड्रेसची किंमत किती आहे? जाणून घेऊयात..
Mrunal Thakur dress price
1/10

अभिनेत्री मृणाल ठाकूर तिच्या 'सन ऑफ सरदार 2' या चित्रपटातून मधून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. चित्रपटाच्या रिलीजआधी ती मुंबईत प्रमोशनसाठी कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहे.
2/10

नेहमीप्रमाणेच मृणालने यावेळीही एक स्टायलिश आणि एलिगंट लूक सादर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
3/10

मुंबईत पार पडलेल्या प्रमोशन इव्हेंटसाठी मृणालने इंडो-वेस्टर्न लूक निवडला होता. तिच्या लाल रंगाच्या आउटफिटने ती सगळ्यांची नजर खिळवून ठेवत होती.
4/10

तिने सहकलाकार अजय देवगणसोबत पोझ दिली आणि नंतर सोलो फोटोसाठी पॅपराझींना पोजही दिल्या. तिचा हा लूक कम्फर्ट, एलिगन्स आणि स्टाइल यांचा उत्तम मिलाफ ठरला.
5/10

या प्रमोशनसाठी मृणालने डिझायनर ऋधिमा भसीनच्या कलेक्शनमधील 'मिहिरा जॅकेट सेट' परिधान केला होता, ज्याची किंमत सुमारे ₹64,000 आहे.
6/10

शिफॉन आणि ऑर्गेन्झा फॅब्रिकपासून तयार झालेला हा तीन भागांचा सेट फुलांच्या नाजूक एम्ब्रॉयडरीने सजलेला आहे. यामध्ये बस्टियर ब्लाऊज, मॅचिंग फ्लोई शरारा पँट्स आणि लॉन्ग शीयर जॅकेटचा समावेश आहे.
7/10

मृणालने गोल्डन स्टेटमेंट रिंग आणि नेकपीस परिधान केला होता. फूटवेअर म्हणून तिने वेज सँडल्स निवडल्या होत्या.
8/10

मेकअपबाबत बोलायचं झालं, तर मृणालने फ्लॉलेस बेस, कोहल, आयलाइनर, मस्कारा आणि ब्राऊन आयशॅडो वापरला होता. गालांवर थोडं ब्लश आणि ओठांवर हलकासा पिंक शेड तिच्या लूकला फ्रेश टच देत होता.
9/10

मृणाल शेवटची ‘द फॅमिली स्टार’ या चित्रपटात विजय देवरकोंडासोबत झळकली होती. तिने 'कल्कि 2898 AD' मध्येही एक छोटा कॅमिओ केला आहे.
10/10

'सन ऑफ सरदार 2' व्यतिरिक्त तिच्याकडे ‘डकैत: अ लव्ह स्टोरी’, ‘हाय जवानी तो इश्क होना है’, ‘तुम हो तो’, आणि ‘पूजा मेरी जान’ हे प्रोजेक्ट्स देखील पाइपलाइनमध्ये आहेत.
Published at : 27 Jul 2025 07:24 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
ट्रेडिंग न्यूज



















