बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूरच्या (Arjun Kapoor) चित्रपटांना त्याच्या चाहत्यांची पसंती मिळते. अर्जुन सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असतो.
2/5
वेगवेगळ्या पोस्ट अर्जुन सोशल मीडियावर शेअर करतो. त्याला वेगवेगळ्या बाईक्सचं कलेक्शन करायला देखील आवडतं.
3/5
नुकताच अर्जुननं त्याच्या नव्या बाईकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या बाईकचं नाव Ducati Scrambler 1100 असं आहे.
4/5
अर्जुननं नव्या बाईकचा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'हा माझा नवा मित्र. मी वीकेंडला या मित्राला भेटायला येतो. ' अर्जुनच्या या नव्या बाईकची किंमत आणि खास गोष्टी जाणून घेऊयात-
5/5
अर्जुननं घेतलेल्या Ducati Scrambler 1100 या बाईकची किंमत तेरा लाख रूपये आहे. या बाईकमध्ये 1079 सीसी, एयर-कूल्ड, ट्विन-सिलेंडर इंजन आहे. हे इंजन 84.48 बीएचपी मॅक्सिमम पावर आणि 88 एनएम पीक टार्क जनरेट करू शकते. बाईकमध्ये 6-स्पीड गियरबॉक्स देखील असते. (all photo: arjun kapoor/ig)