Shahid Kapoor: 'या' कारणामुळे शाहिदला जर्सी चित्रपट खूप आवडतो..
Written By : abp majha web team | Updated at : 05 May 2022 12:55 PM (IST)
(photo:shahidkapoor/ig)
1/6
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) 'जर्सी' (Jersey) या चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल 3 वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतला आहे. (photo:shahidkapoor/ig)
2/6
चा चित्रपट खूप आधी प्रदर्शित झाला असता, पण कोरोना महामारीमुळे त्याचे प्रदर्शन सतत पुढे ढकलण्यात आले. शाहिद कपूरचा शेवटचा चित्रपट 'कबीर सिंग' 2019 साली रिलीज झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. (photo:shahidkapoor/ig)
3/6
या चित्रपटाने शाहिदला एक वेगळी ओळख मिळवून दिली होती. नुकत्याच एका प्रसिद्ध वेबसाईटला दिलेल्या मुल्खातीत शाहिद कपूरने 'जर्सी' त्याच्या हृदयाच्या किती जवळ आहे, याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (photo:shahidkapoor/ig)
4/6
या खास मुलाखतीत शाहिद म्हणाला, ‘जर्सीच्या रिलीजसाठी दोन वर्षे वाट पाहिली. कारण लोकांसाठी आरोग्य महत्त्वाचे असताना चित्रपट प्रदर्शित करणे अजिबातच शहाणपणाचे नव्हते. 'जर्सी' हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. कारण त्यात तुम्ही कुटुंब आणि मित्रांसोबत अनुभवलेल्या भावना आहेत. मला हा चित्रपट खूप आवडतो. कारण या चित्रपटाने मला परिस्थितीची पर्वा न करता कधीही हार न मानण्याची शिकवण दिली आहे आणि म्हणूनच मी या चित्रपटाशी मनाने खूप जोडलो गेलो आहे.’ (photo:shahidkapoor/ig)
5/6
शाहिद कपूर म्हणाला, ‘मूळ चित्रपटातूनच खूप प्रेरणा मिळाली. चित्रपट पाहून वाटलं की, मी माझ्या मुलांच्या नजरेत स्वतःला कमी पडू देऊ शकत नाही. एक पालक म्हणूनही, तुम्हाला तुमच्या मुलाने करू इच्छित असलेल्या प्रत्येक गोष्टीचे प्रतिनिधित्व करावे लागेल आणि त्यात सहभागी व्हावे लागेल. तुम्हालाही उदाहरण देऊन नेतृत्व करावे लागेल. नाही तर तुम्ही बोलता एक आणि करता एक असं होईल, जे योग्य नाही.’ (photo:shahidkapoor/ig)
6/6
‘जर्सी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, बॉक्स ऑफिसवर काही विशेष जादू दाखवू शकलेला नाही. मात्र, तरीही या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. या चित्रपटात मृणाल ठाकूर आणि शाहिद कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. (photo:shahidkapoor/ig)