एक्स्प्लोर
Rajkummar Rao Birthday Special: राजकुमार रावचे ते चित्रपट ज्यात त्याचे चाहतेही त्याला ओळखू शकले नाहीत, फोटो पहा
संपादित फोटो
1/9

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव हा असा अभिनेता आहे, ज्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करत कोणत्याही भूमिकेत तो फिट असल्याचे सिद्ध केले. 400 वर्षांच्या बाबांची भूमिका असो किंवा वेडसर पतीची भूमिका असो, स्त्रीची व्यक्तिरेखा असो किंवा नेताजी सुभाषचंद्रांसारखा महापुरुष असो, ही पात्रे प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याला असा गेटअप देण्यात आला की काही वेळा त्याला ओळखणेही कठीण होते. एकंदरीत असे म्हणता येईल की राजकुमार राव एक अशी व्यक्ती आहे जी प्रत्येक पात्र मनापासून प्रत्यक्षात उतरवते. अशीच काही भन्नाट पात्र तुमच्यासाठी घेऊन आलोत.
2/9

राजकुमार राव मोहित सुरीच्या 'हमारी अधुरी कहानी' या चित्रपटात दिसला. या चित्रपटातील त्याचे पात्र हिंसक पतीचे होते. या भूमिकेत त्याने जीव ओतला होता. राजकुमार राव या चित्रपटात लहानपणापासून हिंसक आणि नंतर म्हातारपणापर्यंत अनेक टप्प्यातून गेला.
Published at : 31 Aug 2021 06:32 PM (IST)
आणखी पाहा























