Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 25 Jun 2021 09:15 PM (IST)
(Photo : @hegdepooja instagram)
1/6
साउथ आणि बॉलिवूड चित्रपटात सर्वांना आपल्या सौंदर्याने वेड लावणाऱ्या पूजा हेगडेने पुन्हा एकदा आपला दिवा लूक चाहत्यांसमोर शेअर केला आहे. पूजा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे. आणि तिथे ती तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी खूप प्रसिद्ध आहे. अलीकडेच पूजाने तिचा साडीमधील लूक चाहत्यांसाठी शेअर केला आहे, ज्यात ती कहर दिसत आहे.(Photo : @hegdepooja instagram)
2/6
पूजा हेगडे जरी प्रत्येक लुकमध्ये सुंदर दिसत असली तरी जेव्हा ती साडी नेसते तेव्हा ती अधिक आकर्षक दिसते. चाहत्यांना तिचे फोटो पाहायला कधीच कंटाळा येत नाही.(Photo : @hegdepooja instagram)
3/6
तिचा लेटेस्ट एथनिक लुक परिपूर्ण आहे. मनीष मल्होत्राने डिझाईन केलेल्या साडीमध्ये पूजा दिवा दिसत आहे.(Photo : @hegdepooja instagram)
4/6
पूजाने व्हाइट-गोल्डन आणि सिल्व्हर शिमरी एम्ब्रॉयडरी वर्क साडीसोबत डीप-कट येलो ब्लाउज घातला होता. या बरोबरच तिने केसात बन बनवला होता. या पेहरावामुळे तिचा लुक एकदम क्लासी आणि एलिगेंट झाला होता.(Photo : @hegdepooja instagram)
5/6
दागिन्यांविषयी बोलताना पूजाने कानात अनमोल ज्वेलर्सचे मोठ्या कानातले, डायमंड बांगड्या आणि बोटात अंगठ्या घातल्या आहेत, ज्या तिचा लूक पूर्ण करत आहेत.(Photo : @hegdepooja instagram)
6/6
कामाबद्दल बोलायचे झाले तर पूजा प्रभाससोबत राधे श्याम या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती थलपथी 65 मध्येही काम करणार आहे.(Photo : @hegdepooja instagram)