In Pics : Ranveer Singh- Deepika Padukone यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन दिल्लीत
Written By : एबीपी माझा वेबटीम | Updated at : 14 Nov 2021 10:39 PM (IST)
रणवीर-दीपिका
1/5
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहचा आज लग्नाचा तिसरा वाढदिवस आहे. लग्नाचा तिसरा वाढदिवस त्यांनी दिल्लीत साजरा केला आहे.
2/5
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहचे सध्या व्यस्त वेळापत्रक आहे. रणवीर सध्या दिल्लीत रॉकी और राणी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळेच दीपिका लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दिल्लीत पोहोचली होती.
3/5
रणवीरचे शूटिंग संपल्यानंतर दीपिका आणि रणवीर दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. दीपिका आणि रणवीरचा लग्नसोहळा 14 नोव्हेंबरला इटलीत पार पडला होता.
4/5
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी बालाजी मंदिर, अमृतसरच्या सुवर्णमंदिरात गेले होते.
5/5
शकुन बत्राच्या आगामी सिनेमात दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत असणार आहे. तर रणवीर सध्या करण जौहरच्या रॉकी और राणी की प्रेम कहानी सिनेमात दिसणार आहे.