एक्स्प्लोर
In Pics | Salman Khan ने मारहाण केल्याच्या बातम्यांवर Aishwarya Rai म्हणाली होती...
Salman_Aishwarya_5
1/5

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्यामध्ये फार चढ-उतार पाहायला मिळाले. एक काळ असा होता की दोघांनी एकमेकांची आयुष्यभर साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या होता. पण मारहाणीचं वृत्त समोर आल्यानंतर या दोघांच्या नात्यात दुरावा आला. या फोटो गॅलरीद्वारे अशा एका घटनेबाबत सांगणार आहोत, ज्यामुळे मीडियाचं ध्यान आकर्षिक केलं.
2/5

ही घटना होती 2002 मध्ये झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यातली. ज्यात ऐश्वर्या रायने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे ओढून घेतलं. या पुरस्कार सोहळ्यात पोहोचलेल्या ऐश्वर्याचा हात मोडला होता आणि तिने डोळ्यांवर काळ्या रंगाचा मोठा गॉगल घातला होता.
3/5

ऐश्वर्याचं हे रुप पाहताच अफवांना उधाण आलं होतं. अटकळ अशीही बांधली जात होती की, सलमान खानने ऐश्वर्या रायला मारहाण केली.
4/5

पण ही गोष्ट जेव्हा ऐश्वर्याला समजली तेव्हा तिने सलमानने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप फेटाळत सांगितलं की ती पायऱ्यांवरुन घसरल्याने ही अवस्था झाली.
5/5

शिवाय सलमान खानने मारहाण केल्याच्या अफवांवर नाराजी व्यक्त करत ऐश्वर्या म्हणाली की, "मी पायऱ्यांवरुन पडले यावर लोकांचा विश्वास का बसत नाही. हीच मीडिया मला एका कणखर महिलेच्या रुपात दाखवते आणि मीडियाच आज मला असहाय्य असल्याचं दाखवत आहे. मी हा बालिशपण सहन करणार नाही."
Published at : 17 Mar 2021 08:43 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
मुंबई
करमणूक
मुंबई
























