एक्स्प्लोर
लॉकडाऊनमध्ये घरात बसून कंटाळा आलाय? हा वीकेंड ताजातवाना करण्यासाठी या वेब सीरीज पहा
संपादित छायाचित्र
1/7

कोरोना संकटामुळे देशाच्या मोठ्या भागात अंशतः लॉकडाउन आहे. सावधगिरी म्हणून लोक घराबाहेर पडण्याचं टाळत आहेत. अशा परिस्थितीत कंटाळा येणे साहजिक आहे. अशात तुम्हाला या शनिवार व रविवारला रीफ्रेश व्हायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला डिजिटल प्लॅटफॉर्मवरील काही खास वेब सीरीजबद्दल सांगत आहोत ज्यामुळे या मानसिक तणावाच्या परिस्थितीत आपले मन ताजे होईल.
2/7

ज्यूपिटर्स लेगसी - नेटफ्लिक्स या अमेरिकन सुपरहिरो ड्रामा सीरीजला बरीच पसंती दिली जात आहे. याची सर्व पात्रे सुपरहीरोची पहिली पिढी असून पुढच्या पिढीला त्यांची जबाबदारी सोपवताना अडचणींचा सामना करावा लागतोय. या मालिकेत आपल्याला अनेक मनोरंजक आणि मजेदार क्षण पहायला मिळतील.
3/7

थँक यू ब्रदर - हा व्हिडिओ ही एक थ्रिलर फ्लिक आहे. गर्भवती महिलेच्या या कथेत बरेच मनोरंजक वळणे आहेत. ही महिला कोट्याधीश असलेल्या प्लेबॉयसोबत लिफ्टमध्ये अडकली आहे. अनूसुया भारद्वाज आणि विराज अश्विनसमवेत मोनिका रेड्डी या मालिकेत महत्वाची भूमिका साकारताना दिसत आहे.
4/7

फोटो प्रेम - अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर नीना कुलकर्णींच्या उत्तम अभिनयाने सुशोभित केलेला हा चित्रपट मराठी कॉमेडी ड्रामा आहे. आदित्य राठी आणि गायत्री पाटील यांचा हा डेब्यू प्रोजेक्ट चांगलाच गाजत आहे. शनिवार, रविवार मजेत घालवण्याचा हा एक चांगला पर्याय आहे.
5/7

मर्डर मेरी जान - डिस्ने प्लस हॉटस्टारवर ही एक ठग वधू आणि पोलिसांच्या मनोरंजक कथेवर आधारित एक वेब मालिका आहे. या कथेत तेव्हा मजा येते जेव्हा या वधूचं लग्न पोलीस कर्मचाऱ्यासोबत होते. या खोट्या लग्नासोबत एक खुनाचं गूढही आहे जे प्रेक्षकांना शेवटपर्यंत बांधून ठेवते. सोनल अरोरा आणि तनुज विरानी मुख्य भूमिकेत दिसले आहेत.
6/7

रामयुग - एमएक्स प्लेयरवर कुणाल कोहलीची रामयुग ही रामायण या प्राचीन पुस्तकावर आधारित एक आधुनिक मालिका आहे. यामध्ये दिगनाथ मनचाले, अक्षय डोगरा आणि ऐश्वर्या ओझा रामायणातील मुख्य पात्रं रंगवत आहेत. मात्र, त्यांची तुलना रामानंद सागर यांच्या मालिकेसोबत करणे चूक ठरेल.
7/7

माइलस्टोन - नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर इव्हान अय्यरची 'माईलस्टोन' ही एका मध्यमवयीन ट्रक चालक गालिबच्या वैयक्तिक दुःखांची कहाणी आहे. एका नवीन मुलामुळे या व्यक्तीला आपली नोकरी जाण्याची भीती वाटत आहे. सुविंदर विक्की आणि लक्ष्वीर सरन यांच्या मुख्य भूमिकेसह या मालिकेला बरीच पसंती दिली जात आहे.
Published at : 08 May 2021 04:55 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
व्यापार-उद्योग
मुंबई


















