एक्स्प्लोर
Taylor Swift AI Deepfakes : एलॉन मस्कने उचलले 'हे' मोठे पाऊल; आक्षेपार्ह फोटो व्हायरल
Taylor Swift AI Deepfakes : एलॉन मस्कने उचलले 'हे' मोठे पाऊल; आक्षेपार्ह फोटो व्हायरल

Taylor Swift AI Deepfakes (Photo Credit : .instagram/taylorswift)
1/10

गेल्या काही दिवसांपासून डीपफेक व्हिडीओच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna),कतरिना कैफ (Katrina Kaif), नोरा फतेही (Nora Fatehi) यांचे डीपफेक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले आहेत.(Photo Credit : .instagram/taylorswift)
2/10

आता प्रसिद्ध अमेरिकन गायिका टेलर स्विफ्टचा देखील आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Photo Credit : .instagram/taylorswift)
3/10

हा फोटो AI च्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे. हा फोटो ट्विटर म्हणजेच X वर शेअर करण्यात आला होता. याबाबत तक्रार मिळाल्यानंतर एलॉन मस्क (Elon Musk) यांनी हे फोटो X वरुन हटवले आहेत.(Photo Credit : .instagram/taylorswift)
4/10

ट्विटर म्हणजेच X वर टेलर स्विफ्टचे आक्षेपार्ह फोटो शेअर करण्यात आले. रिपोर्टनुसार, 4.5 कोटी लोकांनी हा फोटो पाहिला तर 24,000 हून अधिक लोकांनी हा पोस्ट रिपोस्ट केला.(Photo Credit : .instagram/taylorswift)
5/10

या फोटोला हजारो लाइक्स मिळाले. मात्र, युजर्सच्या तक्रारीनंतर या फोटोला आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून हटवण्यात आल्या आहेत.(Photo Credit : .instagram/taylorswift)
6/10

टेलर स्विफ्टचे फोटो समोर आल्यानंतर, 'Taylor Swift AI' हा हॅशटॅग X वर ट्रेंड होऊ लागला.एलॉन मस्क यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन टेलर स्विफ्टचा आक्षेपार्ह फोटो काढून टाकला.(Photo Credit : .instagram/taylorswift)
7/10

एलॉन मस्क यांनी आणखी एक पाऊल उचलले. आता X म्हणजेच ट्विटरवर तुम्ही 'टेलर स्विफ्ट' सर्च केलं तर तुम्हाला काहीही दिसणार नाही.तुम्ही ‘टेलर स्विफ्ट एआय’ टाइप करून सर्च केले तरी तुम्हाला स्क्रिनवर काहीही दिसणार नाही. (Photo Credit : .instagram/taylorswift)
8/10

X ने अशा शब्दांवर बंदी घातली आहे, जेणेकरून टेलर स्विफ्टचे आक्षेपार्ह फोटो कोणालाही दिसू नयेत.(Photo Credit : .instagram/taylorswift)
9/10

X मधून निवडलेल्या शब्दांवर बंदी घालणे खरोखरच एलॉन मस्क यांचे एक मोठे पाऊल आहे. असे शब्द लिहून एआयच्या गैरवापराची बळी ठरलेल्या टेलर स्विफ्टचा व्हायरल झालेला फोटो कोणालाही बघता येणार नाही.(Photo Credit : .instagram/taylorswift)
10/10

मात्र, तुम्ही फक्त 'टेलर' किंवा 'स्विफ्ट' टाइप केल्यास, टेलर स्विफ्टशी संबंधित पोस्ट सर्चमध्ये दिसतील.(Photo Credit : .instagram/taylorswift)
Published at : 28 Jan 2024 04:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
