एक्स्प्लोर
In Pics | Kareena Kapoor ते Malaika Arora; 'या' बॉलिवूड अभिनेत्रींकडून लसीकरणाचं आवाहन
Feature_Photo_4
1/6

देशातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन विविध भागात विविध नियम लागू करण्यात आले आहेत. आता केंद्र सरकारने 18 वर्षावरील सर्वांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेतला आहे. अशावेळी बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी लोकांनी कोरोनाची लस घ्यावी असं आवाहन केलं आहे.
2/6

लोकांना फिट राहण्याचा सल्ला देणारी मलायका अरोरा आता लोकांनी कोरोनाची लस घ्यावी असा सल्ला देतेय. मलायकाने आपल्या इन्स्टाग्रामवरून हे आवाहन केलंय.
3/6

अभिनेत्री आलिया भट्टचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. या कठीण परिस्थितीत प्रत्येकाने कोरोनाची लस घ्यावी असं आवाहन तिनं केलं आहे.
4/6

अभिनेत्री करीना कपूरने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये 'Let's do this' असं सांगत लवकरात लवकर लस घ्यावी असं आवाहन केलंय.
5/6

'स्टुडन्ट ऑफ द इयर' या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या करियरला सुरूवात करणाऱ्या अन्यन्या पांडेने लोकांना कोरोनाची लस घ्यावी असं आवाहन केलंय.
6/6

आपल्या लूकमुळे अभिनेत्री हुमा कुरेशी नेहमी चर्चेत असते. आता तिने कोरोनाच्या लसीबद्दल सर्व माहिती देताना प्रत्येकाने ही लस घ्यावी असं आवाहन केलंय.
Published at : 20 Apr 2021 10:43 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
विश्व
भारत
























