एक्स्प्लोर
Happy Birthday Chitrangada Singh : बॉलिवूडमध्ये येण्याआधीच झालं होतं चित्रांगदा सिंहचं लग्न, जाणून घ्या तिचा आतापर्यंतचा प्रवास
Chitrangada Singh
1/8

अभिनेत्री चित्रांगदा सिंहचा आज 46वा वाढदिवस आहे. चित्रांगदा सिंह अभिनेत्री असण्यासोबतच मॉडेल आणि चित्रपट निर्मातीही आहे. चित्रांगदाचा जन्म 28 मार्च 1976 रोजी झाला.
2/8

तिने चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
3/8

चित्रांगदा तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त फिटनेसच्या बाबतीतही चर्चेत असते. फार कमी लोकांना माहीत आहे की, चित्रांगदा एका मुलाची आई आहे.
4/8

चित्रांगदाने दिल्लीच्या श्रीराम कॉलेजमधून होम सायन्समध्ये पदवी शिक्षण घेतलं आहे.
5/8

चित्रांगदाने कॉलेजच्या दिवसांपासूनच मॉडेलिंगला सुरुवात केली होती. या काळात तिला अनेक मोठ्या जाहिराती मिळाल्या.
6/8

चित्रांगदा अल्ताफ राजाच्या 'तुम तो वहाँ परदेसी' या अल्बममधून पहिल्यांदाच प्रकाशझोतात आली.
7/8

चित्रांगदाने 2005 साली 'हजारो ख्वाईशे ऐसी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
8/8

चित्रांगदाने चित्रपटसृष्टीत येण्याआधीच 2001 मध्ये भारतीय गोल्फर ज्योती रंधवासोबत लग्न केले. त्यांना एक मुलगाही आहे. पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि 2014 मध्ये त्यांचा घटस्फोट घेतला.
Published at : 28 Mar 2022 02:39 PM (IST)
आणखी पाहा























