एक्स्प्लोर
Bigg Boss 16 Winner : आठवीत असताना सोडलं शिक्षण, जाणून घ्या पुण्यातील झोपडपट्टीत राहणाऱ्या 'MC Stan'चा 'बिग बॉस 16'च्या विजेतेपदापर्यंतचा प्रवास...
MC Stan : एमसी स्टॅनने आठवीत असताना पहिलं रॅप सॉंग गायलं. त्यानंतर त्याने शिक्षणाला रामराम ठोकला.
MC Stan
1/10

लोकप्रिय रॅपर एमसी स्टॅन 'बिग बॉस 16'चा विजेता ठरला आहे.
2/10

एमसी स्टॅनचे खरे नाव अल्ताफ शेख असून पुण्यातील झोपडपट्टीत 30 ऑगस्ट 1999 रोजी त्याचा जन्म झाला.
3/10

एमसी स्टॅनने वयाच्या 12 व्या वर्षी कव्वालीच्या माध्यमातून संगीतक्षेत्रात पदार्पण केलं.
4/10

बालपणीच गाण्याची आवड लागल्याने एमसी स्टॅनने शिक्षणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं.
5/10

एमसी स्टॅनने आठवीत असताना पहिलं रॅप सॉंग गायलं. त्यानंतर त्याने शिक्षणाला रामराम ठोकला.
6/10

'समझ मेरी बात को' या गाण्याच्या माध्यमातून एमसी स्टॅनच्या करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
7/10

'तडीपार' या अल्बममुळे एमसी स्टॅन लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे.
8/10

एमसी स्टॅनने त्याच्या डायलॉग आणि हटके स्टाइलमुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
9/10

एमसी स्टॅन एक रॅपर म्हणून लोकप्रिय असण्यासोबत त्याचे नेकपीस आणि शूजदेखील चाहत्यांच्या पसंतीस उतरतात.
10/10

23 वर्षीय एमसी स्टॅन गाणी, युट्यूब आणि कॉन्सर्टच्या माध्यमातून दर महिन्याला लाखो रुपये कमावतो.
Published at : 13 Feb 2023 09:02 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























