एक्स्प्लोर
PHOTO : कोणी वॉकरने, कोणी अॅम्ब्युलन्समधून मतदानाला विधानभवनात!
Laxman Jagtap, Mahendra Dalvi, Mukta Tilak
1/5

राज्यसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचं ठरत आहे. एकही आमदार रणांगणाबाहेर राहू नये यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांकडून खबरादारी घेतली जात आहे. त्यामुळे आजारी असलेले आमदारही आज मतदानासाठी विधानभवनात दाखल झाले. या आमदारांमध्ये भाजपच्या मुक्ता टिळक, भाजपचेच लक्ष्मण जगताप आणि शिवसेनेचे महेंद्र दळवी यांचा समावेश आहे. आमदारांनी मतदानासाठी हजर राहावं यासाठी भाजप आणि शिवसेनेने अॅम्ब्युलन्सची सोय केली होती.
2/5

आमदार मुक्ता टिळक : पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक या मतदानासाठी आज अॅम्ब्युलन्समधून विधानभवनात पोहोचल्या. मुक्ता टिळक कर्करोगाशी झुंज देत आहेत. तब्येत खालावलेली असतानाही मुक्ता टिळक राज्यसभेच्या मतदानासाठी आल्या होत्या. मुक्ता टिळक तीन दिवसांपूर्वीच मुंबईत आल्या होत्या. आज मतदानाच्या दिवशी त्यांना अॅम्ब्युलन्समधून विधानभवनात आणलं. कार्यकर्ता म्हणून पक्षाचा आदेश पाळणं माझी जबाबदारी अशी प्रतिक्रिया त्यांनी मुंबईला रवाना होण्यापूर्वी दिली होती.
Published at : 10 Jun 2022 04:04 PM (IST)
आणखी पाहा























