एक्स्प्लोर
Rajasthan Survey: राजस्थानात काँग्रेसला गेहलोत-पायलट वादाचा फटका बसणार? सर्वेक्षणातून धक्कादायक आकडेवारी
ABP C Voter Survey 2023: राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 25 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

Rajasthan Election 2023 | ABP C Voter Survey
1/9

ABP C Voter Survey 2023: राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 25 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकांचं बिगुल वाजलं असून निवडणूक मतदानापूर्वी सीव्होटरनं एबीपी न्यूजसाठी सर्वेक्षण केलं होतं.
2/9

राजस्थान विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेसनं सत्तेत परतण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली आहे. स्थानिक ते राष्ट्रीय पातळीवरील नेते प्रचारासाठी भेटी देत आहेत
3/9

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विजयाचा दावा करत आहे, पण निवडणुकीपूर्वी एबीपी न्यूज सीव्होटर्सच्या सर्वेक्षणात एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
4/9

CVoter च्या सर्वेक्षणात जनतेला विचारण्यात आलं होतं की, राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील लढतीमुळे काँग्रेसचं किती नुकसान होईल?
5/9

सर्वेक्षणात राजस्थानमध्ये अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील लढतीमुळे काँग्रेसचं नुकसान होईल, असं 53 टक्के लोकांचं मत आहे.
6/9

सर्वेक्षणानुसार, अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील लढतीमुळे काँग्रेसचं नुकसान होणार नाही, असं 29 टक्के लोकांचं म्हणणं आहे.
7/9

याशिवाय गेहलोत-पायलट लढतीमुळे काँग्रेसचं थोडं नुकसान होईल, असं 16 टक्के लोकांचं मत आहे, तर 2 टक्के लोकांनी यावर काहीही बोलू शकत नसल्याचं म्हटलं आहे. मात्र, निवडणुकीच्या वर्षात काँग्रेस हायकमांडनं दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन घडवून आणलं आहे.
8/9

दरम्यान, 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. याच मुद्द्यावर एबीपी न्यूजसाठी सीव्होटरनं सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणात 2 हजार 649 लोकांनी आपली मतं मांडली आहेत.
9/9

सर्वेक्षण 14 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आलं आहे. सर्वेक्षणाचं मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ते प्लस मायनस 5 टक्के आहे. सर्वेक्षणाचा निष्कर्ष पूर्णपणे लोकांशी साधलेला संवाद आणि त्यांनी व्यक्त केलेली मत यावर आधारीत आहे. याला एबीपी न्यूज जबाबदार नाही.
Published at : 17 Oct 2023 11:17 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
धुळे
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
